TRENDING:

Snake Facts : साप तर खूप आहेत पण माणसांसाठी सर्वात खतरनाक कोणता? इथं पाहा

Last Updated:

साप किती खतरनाक हे बऱ्याच गोष्टींवर अवलंबून आहे. त्याच्यातील विषाचं प्रमाण, विषाच्या थैलीचा आकार, त्याच्या दातांची लांबी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सापाची आक्रमकता. आता या मानकांनुसार कोणता साप सर्वात खतरनाक आहे ते पाहुयात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली :  साप हा पृथ्वीवरील सर्वात विषारी प्राण्यांपैकी एक आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार दर पाच मिनिटांनी जगाच्या कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यात सर्पदंशामुळे एका व्यक्तीचा मृत्यू होतो. जंगलतोडीमुळे सापांचा धोका कमी झाला आहे, परंतु तरीही ते सजीवांसाठी सर्वात प्राणघातक आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का पृथ्वीवरील मानवांसाठी सर्वात धोकादायक साप कोणता आहे?
सर्वात खतरनाक साप कोणता?
सर्वात खतरनाक साप कोणता?
advertisement

सोशल मीडिया क्वोरावर माणसांसाठी सर्वात धोकादायक साप कोणता? असा प्रश्न विचारण्यात आला. हर्पेटोलॉजिस्ट डग सोफ्रान्को म्हणतात की मानवांसाठी सर्वात धोकादायक साप कोणता हे सांगणं कठीण आहे. कारण ते ठिकाणानुसार भिन्न आहेत. सापाचा विषारीपणा अनेक गोष्टींवर अवलंबून असतो. जसं की त्यात किती विष आहे, ते एलडी-50 च्या मानकावर मोजलं जातं. दुसरे म्हणजे सापाच्या विषाच्या थैलीचा आकार किती आहे, म्हणजे तो किती विष साठवू शकतो. त्यात जितकं विष असेल तितकं तो चावल्यावर इंजेक्शन द्यावं लागतं. तिसरे, सापाच्या दातांची लांबी. जर दात लांब असतील तर ते खोलवर जातील आणि विष अधिक वेगाने पसरेल. चौथं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आक्रमकता.

advertisement

Snake Facts : उन्हाळ्यात का चावतो साप? सर्पदंशाचं हे आहे इंटरेस्टिंग कारण

आता या मानकांनुसार कोणता साप सर्वात खतरनाक आहे ते पाहुयात.

वेस्टर्न टायपन

हा सर्वात विषारी साप आहे LD-50 मानकानुसार, इनलँड किंवा वेस्टर्न टायपन हा सर्वात विषारी साप मानला जातो, ज्याच्या एका थेंबामध्ये 100 पेक्षा जास्त मानवांना मारण्याची शक्ती असते. याच्या विषामध्ये टायटॉक्सिन असतं, जे शरीराच्या नसा अवरोधित करतं. स्नायूंना पक्षाघात होतो. एखाद्या व्यक्तीला श्वास घेता येत नाही आणि क्षणात मृत्यू निश्चित आहे. पण तो फक्त ऑस्ट्रेलियातच आढळतो. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल यामुळे एकाही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही.

advertisement

रॅटल स्नेक

सर्वात मोठी विष ग्रंथी असलेला साप पूर्वेकडील डायमंडबॅक रॅटलस्नेक, क्रोटलस आहे. ते एका वेळी 10 मिलीपर्यंत विष शरीरात साठवू शकतात. पण त्यांचं विष शक्तिशाली नाही. सर्वात लांब दात असलेला साप गॅबून वाइपर आहे, ज्याचे दात 2 इंच लांब असू शकतात. पण ते फक्त आफ्रिकेत आढळतात. त्याच्याशी सामना होणं दुर्मिळ आहे.

advertisement

Snake Facts: साप सरसकट सर्वांना दंश करत नाही, जो 'असा' दिसतो त्यालाच तो डसतो!

किंग कोब्रा दुसऱ्या स्थानावर

जर आपण मानवांसाठी सर्वात धोकादायक सापांबद्दल बोललो तर आफ्रिकेचा ब्लॅक माम्बा पहिल्या स्थानावर आहे, भारताचा किंग कोब्रा दुसऱ्या स्थानावर आहे आणि तिसरा क्रमांक रसेल व्हायपर म्हणजेच क्रेट आहे. जे भारतात देखील आढळते. किंग कोब्रा अनेकदा माणसांना चावतो, त्यामुळे दरवर्षी अनेकांचा मृत्यू होतो. क्रेट सर्वात वेगवान हल्ला करण्यासाठी ओळखला जातो. तो चावला तर मृत्यू येत नाही, पण बऱ्याच समस्या उद्भवतात ज्याचा परिणाम आयुष्यावर होतो. . त्याचप्रमाणे व्ही रुसेली नावाचा साप आहे, जो कोब्रापेक्षा जास्त विषारी आहे.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
Snake Facts : साप तर खूप आहेत पण माणसांसाठी सर्वात खतरनाक कोणता? इथं पाहा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल