तरुणीने रेल्वे ट्रॅकवर कार पळवल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार ही घटना तेलंगणातील आहे. नागुलापल्ली आणि शंकरपल्ली दरम्यान महिलेने थेट रेल्वे ट्रॅकवर गाडी चालवण्यास सुरुवात केली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी महिलेला थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु ती रेल्वे ट्रॅकवर गाडी चालवत राहिली. तिने स्पीडही वाढवला.
स्टेशन मास्टरने तात्काळ सतर्कता दाखवली आणि अनेक गाड्या थांबवल्या, ज्यामुळे कोणताही मोठा अपघात झाला नाही.
दिसायला साधी पण हिचं नाव ऐकताच पुरुषांना फुटतो घाम, प्रत्येक राज्यात हिची दहशत, ही आहे कोण?
महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. सोशल मीडियावरील माहितीनुसार या महिलेने रिल्ससाठी असं केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसंच ती ड्रग्जच्या नशेत होती अशीही माहिती आहे.
advertisement
Location :
Telangana
First Published :
June 26, 2025 2:36 PM IST
मराठी बातम्या/Viral/
तुफानी करायला गेली तरुणी! रेल्वे ट्रॅकवरच पळवली कार, थांबवलं तर स्पीड वाढवला, पुढे घडलं असं...