एका रिपोर्टनुसार, भारतात थोडेथोडके नव्हे तर 38 टक्के नागरिक रोज सिगारेट ओढतात. हे नागरिक एखादी सिगारेट ओढत नाहीत तर किमान पाच तरी सिगारेट्स रोज ओढतात. सिगारेटचे शरीरावर होणारे दुष्परिणाम त्यांना माहिती असतात; पण त्यामुळे त्यांच्या सिगारेट ओढण्यावर कुठलाही परिणाम होत नाही. एका सर्वेक्षणातून समोर आलेल्या माहितीनुसार, भारतात दर तिघांपैकी एक व्यक्ती सिगारेट ओढते. इंडियन टोबॅको कंपनीची गोल्डफ्लेक ही सिगारेट भारतीयांच्या विशेष आवडीची आहे. अर्थात इतरही अनेक ब्रॅंड्सच्या सिगारेट्स भारतात ओढल्या जातात; पण जगातली सगळ्यात महाग सिगारेट कुठली? तिची किंमत किती? ती भारतात मिळते का? ती एवढी महाग असण्याचं कारण काय? पाहू या.
advertisement
Viral News : सोन्या-चांदीपेक्षाही महाग आहे इथली धूळ! 4 कोटी रुपयांत फक्त एक चिमूट..
जगातली सगळ्यात महाग सिगारेट इंग्लंडमध्ये तयार होते. ही काही अशी तशी सामान्य सिगारेट नाही. गर्भश्रीमंत लोकच ही सिगारेट विकत घेऊ शकतात. या सिगारेटचं नाव आहे ट्रेजर लक्झरी ब्लॅक सिगारेट. या सिगारेटच्या पाकिटाची किंमत किती असेल याचा अंदाजही आपण करू शकत नाही. कारण भारतात सर्वसाधारणपणे मिळणाऱ्या सिगारेटची किंमत 10 रुपये आणि पॅकेटची किंमत 100 रुपये असते. ट्रेजर लक्झरी ब्लॅक सिगारेटच्या पाकिटाची किंमत मात्र साडेपाच हजार रुपये आहे. म्हणजे एक सिगारेट पडते किमान पाचशे रुपयांना!
ही सिगारेट एवढी महाग का? या सिगारेटच्या निर्मितीसाठी सगळे सर्वोत्तम घटक वापरले जातात असं कंपनी सांगते. फक्त श्रीमंत लोकच ही सिगारेट विकत घेत असल्यामुळे त्यांच्या आवडीनिवडींना साजेसा या सिगारेट्सचा दर्जा असतो. त्यांचं डिझाइन, निर्मितीमूल्य, पॅकिंग हे सगळंच उत्कृष्ट असतं. या सिगारेटमध्ये 0.5 मिलिग्रॅम निकोटिन असतं. तिची चवही अत्यंत युनिक असते असा कंपनीचा दावा आहे. अर्थात ही सिगारेट गर्भश्रीमंतांसाठीच उपलब्ध असल्यामुळे तिचे ग्राहकही वेगळे आहेत हे नक्की.
जगातला महागडा Vodka! किंमत इतकी की विकत घेण्यासाठी श्रीमंत व्यक्तीही करते हजार वेळा विचार
दुसरीकडे, भारतात मिळणारी सगळ्यात महाग सिगारेट मार्लबोरो ही आहे. हिचं एक पाकिट 350 रुपयांना मिळतं. म्हणजेच ट्रेजर लक्झरी ब्लॅक सिगारेटच्या एका पाकिटाच्या किंमतीत मार्लबोरो सिगारेटची किती तरी पाकिटं येतील. ट्रेजर लक्झरी ब्लॅक सिगारेट अद्याप भारतात मिळत नाही.
सिगारेट स्वस्तात स्वस्त असो की महागात महाग. ती ओढणं शरीरासाठी चांगलं नाहीच. त्यामुळे ही माहिती वाचून सोडून देणं हेच तुमच्या आरोग्यासाठी हिताचं आहे हे नक्की!