Viral News : सोन्या-चांदीपेक्षाही महाग आहे इथली धूळ! 4 कोटी रुपयांत फक्त एक चिमूट..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
धूळ देखील मौल्यवान असू शकते? यावर उत्तर देताना तुमचा गोंधळ उडाला असेल. पण आज आम्ही तुम्हाला अशा ठिकाणाविषयी सांगणार आहोत, जिथे एक चिमूटभर धूळ कोट्यवधींना विकली जाते.
मुंबई, 30 डिसेंबर : 'सगळी मेहनत धुळीला मिळाली.' ही म्हण तुम्ही ऐकली असेलच. धूळ ही नेहमीच काहीही किंमत नसलेली गोष्ट मानली जाते. पण आज आम्ही तुम्हाला धुळीची खरी किंमत सांगणार आहोत. धूळ नेहमीच निरुपयोगी आणि निर्जीव असते असे नाही. कधीकधी धुळीची किंमत करोडोंमध्येही जाते. पण यासाठी ती धूळ कुठून आली आहे, हे फार महत्त्वाचे असते.
आपण कधी विचार केला आहे का? धूळ देखील मौल्यवान असू शकते का? यावर उत्तर देताना तुमचा गोंधळ उडाला असेल, पण आज आम्ही तुम्हाला अशा ठिकाणाविषयी सांगणार आहोत, जिथे एक चिमूटभर धूळ कोट्यवधींना विकली जाते. ही धूळ आपल्या पृथ्वीवरून आलेली नाही तर त्याच्या उपग्रह चंद्रावरून आली आहे. जेव्हा या धुळीचा लिलाव झाला, तेव्हा चिमूटभर धूळ विकत घेण्यासाठी लोक 4 कोटी 16 लाख 71 हजार 400 रुपये मोजण्यास तयार होते.
advertisement
पृथ्वीवर विकली जाणारी सर्वात महाग धूळ चंद्रावरून आणली गेली. त्यामुळेच ही धूळ दुर्मिळ झाली आहे. अपोलो 11 चंद्र मोहिमेदरम्यान पृथ्वीवर आलेल्या बोनहॅम्स येथे त्याचा लिलाव करण्यात आला आहे. एप्रिल 2022 मध्ये 50 लाख डॉलर्स म्हणजेच 4 कोटी 16 लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीला त्याचा लिलाव झाला. ही धूळ खरेदी करणार्याचे नाव माहीत नाही, मात्र चिमूटभर धुळीसाठीची ही बोली इतिहासात नोंदली गेली आहे.
advertisement
धूळ पृथ्वीवर कशी पोहोचली?
ही धूळ अपोलो 11 मोहिमेदरम्यान अंतराळवीर नील आर्मस्ट्राँगने आणली होती. लिलावादरम्यान, त्याची किंमत 4 लाख डॉलर्सपर्यंत होती. परंतु प्रीमियम, शुल्क इत्यादींसह एकूण किंमत 50 लाख डॉलर्सपेक्षा जास्त झाली. जगातील फक्त तीन देशांकडे चंद्राची धूळ आहे - अमेरिका, रशिया आणि चीन. अमेरिकेकडे चंद्रावरील खडकाचे नमुने देखील आहेत तर रशिया आणि चीनकडे फक्त चंद्राची धूळ आहे.
advertisement
(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 30, 2023 10:48 AM IST
मराठी बातम्या/Viral/
Viral News : सोन्या-चांदीपेक्षाही महाग आहे इथली धूळ! 4 कोटी रुपयांत फक्त एक चिमूट..