Pranit More : 'परिणाम वाईट होतील...', धमकी देणाऱ्या बसीर अलीवर भडकला प्रणित मोरे, सर्वांसमोरच केला पाणउतारा

Last Updated:

Bigg Boss 19 Pranit More : काही दिवसांपूर्वी खूप चांगले मित्र म्हणून ओळखले जाणारे प्रणित मोरे आणि बसीर अली यांच्यात जोरदार भांडण झालं आहे, ज्यामुळे त्यांची मैत्री धोक्यात आली आहे.

News18
News18
मुंबई : ‘बिग बॉस’च्या घरात कधी कोण मित्र बनेल आणि कधी कोण शत्रू हे सांगता येत नाही. काही दिवसांपूर्वी खूप चांगले मित्र म्हणून ओळखले जाणारे प्रणित मोरे आणि बसीर अली यांच्यात जोरदार भांडण झालं आहे, ज्यामुळे त्यांची मैत्री धोक्यात आली आहे. एका छोट्याशा कारणावरून सुरू झालेल्या वादाने महाभारताचं स्वरूप धारण केलं आहे.

 बसीर अलीची प्रणित मोरेला थेट धमकी

‘बिग बॉस’च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये, घराचा कॅप्टन असलेल्या बसीर अलीने कामावरून प्रणित मोरे आणि झीशानवर कामचोरीचा आरोप लावला. यावर बसीरने थेट प्रणितला धमकीच्या स्वरात म्हटलं, “जर तुझं वागणं बदललं नाही, तर परिणाम वाईट होतील.” बसीरच्या या बोलण्याने प्रणितचा पारा चांगलाच चढला.
advertisement
प्रणितने उलट उत्तर देत म्हटलं, “मी माझं काम पूर्ण केलं आहे. तू प्रत्येक कामाचा फक्त दिखावा करतोस.” प्रणितच्या या उत्तरानंतर बसीर अधिकच संतापला आणि त्याने त्याला कामचोर म्हटलं. बसीरने स्पष्ट केलं की, त्याचा राग कोणा एका व्यक्तीवर नाही, तर अपूर्ण राहिलेल्या कामावर आहे.












View this post on Instagram























A post shared by ColorsTV (@colorstv)



advertisement

प्रणित मोरे-बसीर अलीच्या मैत्रीचा द एंड?

प्रणित मोरे आणि बसीर अली यांच्यात याआधी खूप चांगली मैत्री होती. पण, कॅप्टन बनल्यानंतर बसीरच्या वागण्यात झालेला बदल प्रणितला आवडलेला दिसत नाही. आता त्यांच्या या भांडणामुळे त्यांच्या मैत्रीचा द एंड होतो का, की ते पुन्हा एकदा एकत्र येतील, हे पाहणं रंजक ठरेल.
advertisement
या आठवड्यात शोमधून ४ स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत, ज्यात मृदुल तिवारी, नतालिया, अवेझ दरबार आणि नगमा मिराजकर यांचा समावेश आहे. तसंच, यावेळी सलमान खानऐवजी अक्षय कुमार आणि अरशद वारसी होस्ट करणार आहेत. त्यामुळे, या आठवड्यात एलिमिनेशन होईल की नाही, याबद्दलही चर्चा सुरू आहे.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Pranit More : 'परिणाम वाईट होतील...', धमकी देणाऱ्या बसीर अलीवर भडकला प्रणित मोरे, सर्वांसमोरच केला पाणउतारा
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement