TRENDING:

5648 चाक, 8 इंजिन आणि 682 डब्बे, जगातील सर्वात लांब ट्रेन, कुठे चालते माहितीय?

Last Updated:

ही जगातील सर्वात लांब मालगाडी आहे, ती 7.3 किलोमीटर लांब आहे आणि तिच्यात तब्बल 682 डबे आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : रेल्वेनं बहुतांश लोक प्रवास करतात. विमानाच्या तुलनेत ट्रेनने प्रवास करण्यासाठी वेळ लागत असला तरी ती सर्वांच्या खिशाला परवडणारी आहे आणि ती देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात तुम्हाला घेऊन जाऊ शकते. त्यामुळे भारतीय रेल्वे आजही अनेकांच्या पसंतीस उतरली आहे. पण याच भारतीय रेल्वेबद्दल अशा काही गोष्टी आहेत, ज्याबद्दल लोकांना अजूनही माहित नाही.
सोर्स : सोशल मीडिया
सोर्स : सोशल मीडिया
advertisement

भारतीय रेल्वेने काही काळापूर्वी देशातील आतापर्यंतची सर्वात लांब मालगाडी ‘रुद्रास्त्र’ पटर्‍यांवर धाववली होती. 4.5 किलोमीटर लांब या गाडीत तब्बल 354 वॅगन असून, तिला 7 इंजिनांनी ओढले.

गंजख्वाजा स्थानकातून निघालेली ही गाडी 200 किलोमीटर दूर गढवा रोडपर्यंत पोहोचली आणि फक्त 5 तासांत प्रवास पूर्ण केला. पण तुम्हाला माहिती आहे का, जगातील सर्वात लांब ट्रेन कोणती आहे? तर, याचा किताब ऑस्ट्रेलियातील ‘द ऑस्ट्रेलियन बीएचपी आयरन ओर’ या मालगाडीने पटकावला आहे.

advertisement

ही जगातील सर्वात लांब मालगाडी आहे, ती 7.3 किलोमीटर लांब आहे आणि तिच्यात तब्बल 682 डबे आहेत. या लांबीची कल्पना देण्यासाठी सांगायचे झाल्यास, यात 22 ‘एफिल टॉवर’ सहज मावतील. इतकी लांब ट्रेन ओढण्यासाठी 8 इंजिनांची गरज भासते. संपूर्ण ट्रेनमध्ये 5,648 चाके आहेत. या गाडीचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदवले गेले आहे. ही केवळ जगातील सर्वात लांब नव्हे, तर सर्वात जड ट्रेन आहे, ज्याचे वजन एक लाख टनांपेक्षा जास्त आहे.

advertisement

‘द ऑस्ट्रेलियन बीएचपी आयरन ओर’ ही ट्रेन लोहखनिज वाहतुकीसाठी वापरली जाते. त्यामुळेच तिचे नाव ‘बीएचपी आयरन ओर’ ठेवले आहे. ती एकूण 99,734 टन लोहखनिज वाहून नेते. 21 जून 2001 रोजी BHP कंपनीने ही ट्रेन सुरू केली. ऑस्ट्रेलियातील यांडी खाणीतून पोर्ट हेडलँडपर्यंतचा 275 किलोमीटरचा प्रवास ही गाडी सुमारे 10 तासांत पूर्ण करते.

advertisement

या गाडीतील इंजिनांचे नियंत्रण अत्याधुनिक प्रणालीद्वारे केले जाते. अग्रभागी असलेला लोको पायलट बाकी सात इंजिनांचे संचालन एकाचवेळी करतो.

मराठी बातम्या/Viral/
5648 चाक, 8 इंजिन आणि 682 डब्बे, जगातील सर्वात लांब ट्रेन, कुठे चालते माहितीय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल