Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घराच्या या दिशेला वॉशरूम असायला पाहिजे; इतक्या अडचणी फक्त त्यामुळे..?
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Vastu Tips Marathi: वास्तुशास्त्रानुसार, घरामध्ये प्रत्येक गोष्टीला एक विशिष्ट दिशा आणि स्थान दिलेलं आहे, ज्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. वॉशरुम हे घरातील सर्वात जास्त नकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे ठिकाण मानले जाते.
मुंबई : घर बांधताना किंवा खरेदी करताना वास्तुशास्त्र नियम पाळल्यानं चांगले परिणाम मिळतात. वास्तुशास्त्रानुसार असलेल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहते, रोगराई येत नाही, घरातील लोकांचे एकमेकांशी चांगले संबंध राहतात, आर्थिक स्थिती चांगली होत जाते, असे मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार, घरामध्ये प्रत्येक गोष्टीला एक विशिष्ट दिशा आणि स्थान दिलेलं आहे, ज्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. वॉशरुम हे घरातील सर्वात जास्त नकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे ठिकाण मानले जाते. त्यामुळे त्याची दिशा योग्य असणे खूप महत्त्वाचे आहे.
वास्तुशास्त्रानुसार, शौचालय बांधण्यासाठी सर्वात योग्य दिशा वायव्य (उत्तर-पश्चिम) आणि दक्षिण आहेत. वायव्य दिशा ही दिशा वाऱ्याची आणि मोकळ्या जागेची दिशा मानली जाते, त्यामुळे नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्यासाठी उपयुक्त आहे. तर दक्षिण दिशेचा संबंध विसर्जनाशी असतो, त्यामुळे या ठिकाणी शौचालय असणे शुभ मानले जाते. या व्यतिरिक्त पश्चिम दिशा देखील वॉशरुमसाठी चांगली मानली जाते.
advertisement
कोणत्या दिशा टाळाव्या - काही दिशांना वॉशरुम असू नये, असे सांगितले जाते. त्यामध्ये ईशान्य ही देवाची दिशा मानली जाते. या दिशेला शौचालय असल्यास आर्थिक नुकसान, मानसिक तणाव आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच उत्तर ही दिशा धन आणि करिअरची मानली जाते. येथे शौचालय असल्यास आर्थिक अडचणी आणि नोकरी-व्यवसायात प्रगती खुंटते. आग्नेय ही दिशा अग्नीची असते. येथे शौचालय असल्यास घरातील सदस्यांमध्ये वाद, आरोग्य समस्या आणि आर्थिक अस्थिरता निर्माण होऊ शकते.
advertisement
नैऋत्य दिशेचा संबंध नातेसंबंध आणि स्थैर्याशी असतो. येथे शौचालय असल्यास कौटुंबिक संबंधांमध्ये तणाव आणि जीवनात अस्थिरता येऊ शकते.
चुकीच्या दिशेला वॉशरुम असल्यास...
कुटुंबातील लोकांना आर्थिक नुकसान, कर्जाचा बोजा आणि व्यवसायात अपयश येऊ शकते. घरातील व्यक्तींना वारंवार आजारपण, पचनसंस्थेचे विकार, डोळ्यांचे विकार आणि मानसिक तणावाचा सोसावा लागतो. पती-पत्नी किंवा घरातील इतर व्यक्तींमध्ये वारंवार वाद आणि गैरसमज निर्माण होतात. करिअरमध्ये प्रगती होत नाही, पदोन्नती थांबते आणि कामाच्या ठिकाणी अनेक अडचणी येतात.
advertisement
जर तुमच्या घरात शौचालय चुकीच्या दिशेला असेल, तर काही सोपे उपाय करून नकारात्मक प्रभाव कमी करता येतो. जसे की, शौचालयाचा दरवाजा नेहमी बंद ठेवणे, आतमध्ये एक लहान वाटीत मीठ ठेवणे आणि बाथरूम नेहमी स्वच्छ ठेवणे.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 12, 2025 9:47 AM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घराच्या या दिशेला वॉशरूम असायला पाहिजे; इतक्या अडचणी फक्त त्यामुळे..?


