Vivah Muhurat 2026: आतापासूनच तयारीला लागा! नवीन वर्ष 2026 मधील शुभ विवाह मुहूर्तांच्या तारखा पाहा
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Vivah Muhurat 2026: पंचांगानुसार, वर्ष 2025 मध्ये 9 डिसेंबरला शुक्र ग्रह अस्त अवस्थेत जाईल आणि वर्ष 2026 मध्ये 3 फेब्रुवारीपर्यंत अस्तच राहील. यामुळे विवाहाचे मुहूर्त मिळणार नाहीत. विवाह मुहूर्तांसाठी बृहस्पती (गुरू) आणि शुक्र हे दोन्ही ग्रह उदित असणं आवश्यक मानलं जातं.
मुंबई : आता वर्ष 2025 संपत चालले असून या वर्षातील राहिलेल्या दोन महिन्यांत विवाहासाठी अनेक शुभ तिथी आहेत. त्याचबरोबर, वर्ष 2026 मध्ये विवाहासाठी किती शुभ मुहूर्त आहेत, हे जाणून घेण्यासाठी अनेकांच्या मनात उत्सुकता आहे.
पंचांगानुसार, वर्ष 2025 मध्ये 9 डिसेंबरला शुक्र ग्रह अस्त अवस्थेत जाईल आणि वर्ष 2026 मध्ये 3 फेब्रुवारीपर्यंत अस्तच राहील. यामुळे विवाहाचे मुहूर्त मिळणार नाहीत. विवाह मुहूर्तांसाठी बृहस्पती (गुरू) आणि शुक्र हे दोन्ही ग्रह उदित असणं आवश्यक मानलं जातं. त्यामुळे शुक्र उदित झाल्यावर 4 फेब्रुवारी 2026 पासून विवाहाचे मुहूर्त सुरू होतील.
advertisement
दरम्यान, वर्ष 2025 मध्ये नोव्हेंबरपासूनच विवाह मुहूर्त सुरू होतील. या अनुषंगाने, वर्ष 2026 मधील विवाह मुहूर्त आणि वर्ष 2025 मधील उर्वरित महिन्यांचे विवाह मुहूर्ताच्या तारखा काय आहेत, ते जाणून घेऊया.
वर्ष 2026 मध्ये विवाहाच्या शुभ तिथी -
फेब्रुवारी 2026 - 5, 6, 8, 10, 12, 14, 19, 20, 21, 24, 25 आणि 26
advertisement
मार्च 2026 - 1, 3, 4, 7, 8, 9, 11 आणि 12
एप्रिल 2026 - 15, 20, 21, 25, 26, 27, 28 आणि 29
मे 2026 - 1, 3, 5, 6, 7, 8, 13 आणि 14
जून 2026 - 21, 22, 23, 24, 25, 26, 27 आणि 29
जुलै 2026 - 1, 6, 7 आणि 11
advertisement
नोव्हेंबर 2026 - 21, 24, 25 आणि 26
डिसेंबर 2026 - 2, 3, 4, 5, 6, 11 आणि 12
नोव्हेंबर आणि डिसेंबर 2025 मधील शुभ विवाह तिथी
वर्ष 2025 मध्ये चातुर्मास संपल्यानंतर नोव्हेंबर 2025 पासून विवाहाचे मुहूर्त सुरू होतील. जगाचे पालनकर्ता भगवान विष्णू प्रबोधिनी एकादशीला योगनिद्रेतून जागे होतील आणि यासोबतच सर्व शुभ कार्ये सुरू होतील. त्याचप्रमाणे विवाहासारखी शुभ कार्येही केली जातील.
advertisement
नोव्हेंबर 2025 - 2, 3, 5, 8, 12, 13, 16, 17, 18, 21, 22, 23, 25, 30
डिसेंबर 2025 - 4, 5, 6
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 29, 2025 3:04 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Vivah Muhurat 2026: आतापासूनच तयारीला लागा! नवीन वर्ष 2026 मधील शुभ विवाह मुहूर्तांच्या तारखा पाहा


