IND vs AUS : भारत-ऑस्ट्रेलिया पहिला T20 सामना पावसामुळे रद्द, आता दुसरी मॅच कधी होणार?
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला पहिला टी-20 सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. या सामन्यात भारताने 9.4 ओव्हरच बॅटिंग केली, पण त्यातही दोनवेळा पावसाने व्यत्यय आणला.
कॅनबेरा : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला पहिला टी-20 सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. या सामन्यात भारताने 9.4 ओव्हरच बॅटिंग केली, पण त्यातही दोनवेळा पावसाने व्यत्यय आणला. पाऊस थांबत नसल्यामुळे अखेर अंपायर आणि मॅच रेफ्रीने सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर भारताने 9.4 ओव्हरमध्ये एक विकेट गमावून 97 रन केले. सूर्यकुमार यादवने 24 बॉलमध्ये नाबाद 39 आणि शुभमन गिलने 20 बॉलमध्ये नाबाद 37 रन केले. अभिषेक शर्मा 14 बॉलमध्ये 19 रन करून आऊट झाला.
आशिया कप विजयानंतर टीम इंडिया पहिल्यांदाच टी-20 फॉरमॅट खेळण्यासाठी मैदानात उतरली होती. या सामन्यात भारतीय टीम दोन फास्ट बॉलर आणि दोन स्पिनरसह दोन ऑलराऊंडरना घेऊन खेळत होती. फास्ट बॉलिंगची जबाबदारी जसप्रीत बुमराह आणि हर्षित राणा यांच्यावर होती, तर वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव हे दोन स्पेशलिस्ट स्पिनर होते. याशिवाय अक्षर पटेल आणि शिवम दुबे या ऑलराऊंडरनाही बॉलिंग करावी लागली असती.
advertisement
पुढचा सामना कधी?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला दुसरा टी-20 सामना आता शुक्रवार 31 ऑक्टोबरला खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी 1.45 वाजता सुरू होईल. जियो हॉटस्टारवर या सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग होईल, तर टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर सामना पाहता येईल.
दुसऱ्या टी-20 साठी भारतीय टीम
सूर्यकुमार यादव, शुभमन गिल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, अभिषेक शर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्सर पटेल, वॉशिंगटन सुंदर, जितेश शर्मा, संजू सॅमसन, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 29, 2025 4:50 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs AUS : भारत-ऑस्ट्रेलिया पहिला T20 सामना पावसामुळे रद्द, आता दुसरी मॅच कधी होणार?


