Corner Plot Vastu: नंतर पश्चाताप व्हायचा! कॉर्नर प्लॉट घेण्यापूर्वी या गोष्टी माहीत असाव्या; वास्तुशास्त्र असं आहे
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Corner Plot: ज्या प्लॉटला दोन्ही बाजूंनी रस्ते असतात, असा प्लॉट म्हणजे कॉर्नर प्लॉट. घर, फार्म हाऊस, शेती, व्यवसाय अशा सगळ्याच कामांसाठी असा प्लॉट सर्वांना हवा हवासा वाटतो. वास्तुशास्त्रात दिशांना महत्त्व आहे..
मुंबई : जागा, प्लॉट खरेदी करताना अनेकांना कॉर्नर प्लॉट हवा असतो. कॉर्नर प्लॉट मिळतोय म्हटल्यावर अनेक लोक जास्त विचार न करता खरेदीसाठी तयार होतात. कॉर्नर प्लॉटचे दरही जास्त असतात, त्यामुळे जास्त किंमत मोजण्यापूर्वी कॉर्नर प्लॉटचे वास्तुशास्त्र समजून घेणे आवश्यक आहे. ज्योतिषी आणि अंकशास्त्र तज्ज्ञ हिमाचल सिंह यांच्याकडून याबाबत सविस्तर जाणून घेऊया.
ज्या प्लॉटला दोन्ही बाजूंनी रस्ते असतात, असा प्लॉट म्हणजे कॉर्नर प्लॉट. घर, फार्म हाऊस, शेती, व्यवसाय अशा सगळ्याच कामांसाठी असा प्लॉट सर्वांना हवा हवासा वाटतो. वास्तुशास्त्रात दिशांना महत्त्व आहे, त्यानुसार जागा कशी, कोणत्या दिशेला उतार, जवळ काय आहे, याचाही विचार केला जातो. अशी जागा ईशान्य कोपरा, नैऋत्य कोपरा किंवा इतर कोणत्या दिशेला असू शकते, त्यावरून त्याचे शुभ-अशुभ परिणाम समजू शकतात.
advertisement
कॉर्नर प्लॉटबद्दल लोकांची वेगवेगळी मते आहेत. बरेच लोक ते खूप चांगले मानतात कारण दोन्ही बाजूंना रस्ते असल्याने भरपूर हवा आणि प्रकाश मिळतो आणि घराचा लूकही सगळीकडून दिसतो. तर काही लोक कॉर्नर प्लॉट चांगले मानत नाहीत. विशेषतः दक्षिण आणि पश्चिम दिशेचा कॉर्नर प्लॉट लोक नाकारतात. या दिशांचे कॉर्नर प्लॉट कुटुंबाच्या प्रगतीला मारक ठरतात, असे मानले जाते.
advertisement
कॉर्नर प्लॉटविषयी आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक लोक डेड एंड प्लॉट आणि कॉर्नर प्लॉट याला एकच समजतात. हे दोन्ही प्लॉट वेगवेगळे आहेत. जिथे रस्ता संपतो तेथील शेवटचा प्लॉट, म्हणजेच पुढे जाण्याचा कोणताही मार्ग नसतो. उदाहरणार्थ, रस्त्यावरील शेवटचे घर ज्याच्या समोर भिंत आहे किंवा मोकळी जागा आहे. याला कॉर्नर प्लॉट म्हणत नाही, तर त्याला डेड एंड म्हणतात. काही लोकांचा असा गैरसमज आहे की डेड एंड प्लॉट अशुभ असतात, परंतु याचा कोणताही ठोस पुरावा नाही, अशा प्लॉटवर अनेक सुखी- आनंदी घरे बांधली गेली आहेत.
advertisement
वास्तुशास्त्रानुसार ईशान्य कोपऱ्यातील कॉर्नर प्लॉट सर्वोत्तम मानला जातो. या ठिकाणी घर बांधणं लकी आणि शुभ ठरतं. परंतु प्रत्येक ठिकाणची जमीन, आजूबाजूच्या इमारती आणि वातावरण वेगळे असते त्यामुळे खरेदीचा निर्णय घेण्यापूर्वी जमिनीची पूर्णपणे तपासणी करणे महत्त्वाचे आहे. वास्तुनुसार योग्य माहिती, योग्य दिशा आणि निसंकोच मनाने निर्णय घेतल्यास प्रत्येक प्रकारच्या जमिनीत आनंद फुलण्याची क्षमता असते. अंतिम निर्णय घेताना वास्तुशास्त्राची माहिती असावी म्हणून ही माहिती देण्यात आली.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 27, 2025 11:13 AM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Corner Plot Vastu: नंतर पश्चाताप व्हायचा! कॉर्नर प्लॉट घेण्यापूर्वी या गोष्टी माहीत असाव्या; वास्तुशास्त्र असं आहे










