advertisement

Daily Numerology: शनिवारचं अंकशास्त्र! या मूलांकांना छोट्या प्रयत्नांतून मोठा लाभ; अपेक्षित फळ

Last Updated:

Today Numerology in Marathi 18 January 2025: ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 18 जानेवारी 2025 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, त्याबद्दल ज्योतिषी चिराग दारूवाला यांनी सांगितलेलं भविष्य जाणून घ्या.

News18
News18
नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
तुमच्या नियंत्रणाबाहेरच्या बाबींमध्ये खूप तीव्रपणे गुंतणं टाळा. आज चांगल्या मूडमध्ये असाल. मदतीच्या ऑफर्स स्वीकारताना सावध राहा. कारण फसवणुकीची शक्यता जास्त आहे. आज खर्च जास्त होतील. अपेक्षित आर्थिक लाभ प्रत्यक्षात येणार नाहीत. जोडीदाराच्या आयुष्यात बदल घडवण्याची संधी आहे.
Lucky Number : 11
Lucky Colour : Peach
नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
advertisement
वरिष्ठांकडे प्रलंबित असलेल्या प्रपोझल्सचा निकाल तुम्हाला अनुकूल असा लागेल. आईशी प्रेमळ संवाद होईल. आरोग्य उत्तम असल्याने दिवसभर उत्साह असेल. सढळ हाताने खर्च करू नका. बचत करा. कामाच्या ठिकाणी तुम्ही ज्या व्यक्तीकडे आकर्षित झाला आहात, त्या व्यक्तीलाही तुमच्याप्रति तीच भावना वाटत आहे. पहिलं पाऊल तुम्ही उचलायचं आहे.
Lucky Number : 5
advertisement
Lucky Colour : Green
नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
भावंडं मदत करतील. छोट्या प्रयत्नांतून मोठा लाभ मिळेल. कला, साहित्य आणि संगीतात आज खूप रस घ्याल. विरोधकांना शांत करायला आज फारसं काही लागणार नाही. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यामुळे कामगिरी सुधारेल. रोमँटिक वातावरण आहे. जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याचा आनंद घ्या.
advertisement
Lucky Number : 4
Lucky Colour : Electric Grey
नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
दुर्बलांच्या प्रगतीसाठी मदत करण्याची संधी मिळेल. आज तुमची मानसिक आणि शारीरिक चाचणी घेतली जाईल. या काळात आरोग्याची काळजी घ्या. पब्लिक रिलेशन्समधून पुरेसे लाभ मिळतील. काटकसरीमुळे जोडीदाराशी असलेल्या रिलेशनशिपला धक्का पोहोचेल.
advertisement
Lucky Number : 6
Lucky Colour : Red
नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
तुमचा उदारपणा आणि दयाळूपणा याला बंधनं नाहीत. आज संमिश्र भावना उचंबळून येत आहेत. डोळ्यांची समस्या चिंताजनक होऊ शकते. वैद्यकीय सल्ला घ्या. नवा प्रोजेक्ट ऐरणीवर आहे. रोमान्सची शक्यता चांगली आहे.
advertisement
Lucky Number : 11
Lucky Colour : Peach
नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
सामाजिक कार्यात सहभागामुळे तुमची दखल घेतली जाईल. कितीही प्रयत्न केले, तरी विरोधक तुम्हाला या वेळी त्रास देऊ शकणार नाहीत. बँकर्स, इन्शुरन्स कंपन्या आणि आर्थिक संस्थांशी डील करण्याचा दिवस आहे. जोडीदाराशी काही नाजूक क्षण शेअर कराल. त्यामुळे आयुष्य खास होईल.
advertisement
Lucky Number : 1
Lucky Colour : Light Red
नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
मित्रांसोबत व्यतीत करण्यासाठी, मजा करण्यासाठी चांगला दिवस आहे. आजचा दिवस मानसिक आणि शारीरिक चाचणी घेईल. आरोग्य चांगलं आहे. त्यामुळे बराच काळ राबू शकाल. आज उधळपट्टीच्या मूडमध्ये असाल. मजा करा. प्रिय व्यक्तीशी वादाची शक्यता आहे. आपोआप सारं काही ठीक होईल; पण तुम्ही काही जोर लावू नका.
Lucky Number : 7
Lucky Colour : Maroon
नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
महत्त्वाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहाल. आनंदी आणि समाधानी आहात. उत्तम यशाचा दिवस आहे. खटला होऊ शकतो. भविष्याचं नियोजन करताना उत्तम कल्पना सुचेल. जोडीदारासोबत समस्या असेल. आनंदी व्हायचं असेल, तर पॉवरप्ले थांबवा.
Lucky Number : 17
Lucky Colour : White
नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
अधिकारी चांगलं वागतील याची खात्री देता येत नाही. त्यामुळे बॉसभोवती सावध वावरा. मुलांशी संबंधित वाईट बातमीमुळे दिवस खराब होईल. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सर्वोच्च पातळीवर आहात. स्टॉक मार्केटमध्ये तोट्याची खूप शक्यता आहे. विवेकीपणे गुंतवणूक करा. जोडीदाराशी बोला, भावना व्यक्त करा. त्यातून प्रेमजीवन सुधारेल.
Lucky Number : 18
Lucky Colour : Rosy Brown
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Daily Numerology: शनिवारचं अंकशास्त्र! या मूलांकांना छोट्या प्रयत्नांतून मोठा लाभ; अपेक्षित फळ
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement