Gemology Marathi: महागडं हिरा रत्न..! कोणत्या राशींसाठी शुभ, कोणत्या राशींसाठी अशुभ?
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Astrology Marathi: शुक्राचे मुख्य रत्न हिरा आहे, ते आकर्षण, प्रेम आणि समृद्धीचे प्रतीक आहे. ज्या व्यक्तींच्या जन्मकुंडलीत शुक्र कमकुवत असतो, त्यांनी योग्य पद्धतीने हिरा धारण केल्यास जीवनात सुख, ऐश्वर्य आणि यश प्राप्त करू शकतात, असे म्हटले जाते. हिरा घालणे
मुंबई : ज्योतिष शास्त्रामध्ये शुक्र ग्रहाला धन, ऐश्वर्य, सौंदर्य आणि भौतिक सुखाचा कारक मानले जाते. शुक्राचे मुख्य रत्न हिरा आहे, ते आकर्षण, प्रेम आणि समृद्धीचे प्रतीक आहे. ज्या व्यक्तींच्या जन्मकुंडलीत शुक्र कमकुवत असतो, त्यांनी योग्य पद्धतीने हिरा धारण केल्यास जीवनात सुख, ऐश्वर्य आणि यश प्राप्त करू शकतात, असे म्हटले जाते. हिरा घालणे कोणत्या राशींसाठी वरदान ठरते आणि कोणत्या राशीच्या लोकांनी हे रत्न घालणे टाळावे, हे जाणून घेऊया.
कोणत्या राशींसाठी हिरा शुभ आहे?
ज्योतिषशास्त्रानुसार, वृषभ, मिथुन, कन्या, तूळ आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी हिरा घालणे अत्यंत फायदेशीर ठरते. जर जन्मकुंडलीत शुक्र ग्रह शुभ स्थितीत किंवा योगकारक असेल, तर हिरा धारण केल्यानं शुभ फळे मिळतात. विशेषत: शुक्राच्या महादशा किंवा अंतरदशेमध्ये हिरा परिधान केल्यानं व्यक्तीची भाग्यवृद्धी, वैवाहिक सुख आणि आर्थिक प्रगती होण्यास मदत होते.
advertisement
हिरा घालण्याचे फायदे - हिरा धारण केल्यानं व्यक्तीच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल दिसून येतात. वैवाहिक जीवनात प्रेम, समन्वय आणि आनंद वाढतो. भौतिक सुख-सुविधा आणि विलासितेत वाढ होते. व्यक्तिमत्त्वात आकर्षण आणि आत्मविश्वास वाढतो. व्यक्तीला मान-सन्मान आणि समाजात प्रतिष्ठा मिळते. हिरा घातल्यानं दीर्घायुष्य आणि मानसिक शांतीही प्राप्त होते, असे मानले जाते.
हिरा धारण करण्याची पद्धत - ज्योतिष शास्त्रानुसार, हिरा कोणत्याही महिन्यातील शुक्ल पक्षातील शुक्रवारी धारण करणे शुभ मानले जाते. तो घालण्यापूर्वी खालील पद्धतीचे पालन करावे:
advertisement
1. हिऱ्याला दूध, गंगाजल, मध आणि खडीसाखर यांच्या मिश्रणाने शुद्ध करा.
2. यानंतर शुक्र ग्रहाच्या मंत्राचा जप करा: “ॐ द्रां द्रीं द्रौं सः शुक्राय नमः” (108 वेळा).
3. मंत्राचा जप झाल्यावर हिऱ्याला चांदी किंवा प्लॅटिनमच्या अंगठीत बसवून उजव्या हाताच्या करंगळीत घाला.
4. हिरा घातल्यानंतर देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूचे स्मरण करा.
advertisement
कोणत्या राशीच्या लोकांनी हिरा घालणे टाळावे?
ज्योतिषानुसार, मेष, सिंह, वृश्चिक, धनु आणि मीन राशीच्या लोकांनी हिरा धारण करू नये. या राशींसाठी हे रत्न अशुभ परिणाम देऊ शकते, ज्यामुळे आर्थिक नुकसान किंवा मानसिक अशांती होऊ शकते. तथापि, कर्क राशीचे लोक काही विशिष्ट ग्रहदशांमध्ये तज्ञांच्या सल्ल्याने हिरा घालू शकतात.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 14, 2025 1:12 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Gemology Marathi: महागडं हिरा रत्न..! कोणत्या राशींसाठी शुभ, कोणत्या राशींसाठी अशुभ?