Shiv Shankar: भोळा शंकर पावणार! दुर्मीळ शुभ योगात सोमप्रदोष व्रताची अशा पद्धतीनं करा पूजा
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Pradosh Shiv puja: सोमवारचा दिवस शंभू-महादेवाला ला समर्पित असतो. अशा वेळी, प्रदोष व्रत आणि सोमवारचा संयोग एक दुर्मीळ आणि अत्यंत शुभ योग मानला जात आहे. या दिवशी व्रत करणाऱ्या शिव-भक्तांना दुप्पट पुण्यफळ प्राप्त होईल.
मुंबई : हिंदू पंचांगानुसार यावेळचे नोव्हेंबर महिन्यातील पहिले प्रदोष व्रत 3 नोव्हेंबर 2025, सोमवारी येत आहे. हा दिवस खास मानला जात आहे, कारण या दिवशी फक्त सोम प्रदोषचा संयोगच नाही, तर रवि योग देखील तयार होत आहे. सोमवारचा दिवस शंभू-महादेवाला ला समर्पित असतो. अशा वेळी, प्रदोष व्रत आणि सोमवारचा संयोग एक दुर्मीळ आणि अत्यंत शुभ योग मानला जात आहे. या दिवशी व्रत करणाऱ्या शिव-भक्तांना दुप्पट पुण्यफळ प्राप्त होईल.
प्रदोष व्रत आणि त्याचे महत्त्व - हिंदू धर्मात प्रत्येक महिन्यात दोनदा त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत केले जाते, एकदा कृष्ण पक्षात आणि दुसऱ्यांदा शुक्ल पक्षात. हे व्रत भगवान शिव आणि माता पार्वतीच्या पूजेसाठी समर्पित असते. शास्त्रांमध्ये म्हटले आहे की, प्रदोष व्रत केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख-समृद्धी आणि यश येते. ज्योतिष जाणकारांनुसार, यावेळची कार्तिक शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी ३ नोव्हेंबरच्या सकाळी ५ वाजून ७ मिनिटांनी सुरू होऊन ४ नोव्हेंबरच्या रात्री २ वाजून ५ मिनिटांपर्यंत राहील. त्यामुळे व्रत ३ नोव्हेंबरलाच केले जाईल.
advertisement
सोम प्रदोषचे विशेष फळ - प्रदोष व्रत सोमवारी येते, तेव्हा त्याला सोम प्रदोष व्रत म्हटले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, हे व्रत केल्याने चंद्राशी संबंधित दोष दूर होतात आणि मनातील इच्छा पूर्ण होतात. ज्यांच्या कुंडलीत चंद्र अशुभ स्थितीत आहे किंवा ज्यांच्या जीवनात मानसिक ताण कायम राहतो, त्यांनी सोम प्रदोषचे व्रत नक्कीच करायला पाहिजे. जे भक्त भगवान शिव आणि माता पार्वतीची विधीपूर्वक पूजा करतात, त्यांना संतती प्राप्ती आणि कौटुंबिक सुखाचा आशीर्वाद मिळतो, असे मानले जाते.
advertisement
व्रत आणि पूजेची पद्धत - प्रदोष व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, सूर्य देवाला अर्घ्य (पाणी) द्यावे आणि व्रताचा संकल्प घ्यावा. यानंतर पूजा करण्याची जागा स्वच्छ करावी आणि भगवान शंकराचा पंचामृताने अभिषेक करावा. शिवलिंगावर बेलाचे पान, धोतरा, फुले, पाणी आणि दूध अर्पण करावे. संपूर्ण कुटुंबासह शिव परिवाराची आराधना करावी आणि प्रदोष व्रत कथेचे वाचन करावे. शेवटी शिव चालीसा आणि आरतीचे वाचन करून भगवान शंकराकडून सुख-समृद्धी आणि कल्याणासाठी इच्छा व्यक्त करावी. व्रताचे पारण पूजा संपल्यानंतरच करावे.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 28, 2025 6:01 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Shiv Shankar: भोळा शंकर पावणार! दुर्मीळ शुभ योगात सोमप्रदोष व्रताची अशा पद्धतीनं करा पूजा


