Sarva Pitru Amavasya 2025: पितृऋण, पितृदोषातून मुक्त होण्यासाठी सर्वपित्री अमावस्येला शिवपिढींवर वाहा या गोष्टी

Last Updated:

Pitru Dosh Remedies: यंदाची सर्वपितृ अमावस्या 21 सप्टेंबर रोजी आहे. या दिवशी शिवलिंगाला विशेष गोष्टी अर्पण केल्यानं पूर्वजांची कृपा मिळते, कुटुंबात शांती, आनंद आणि समृद्धी राहते. ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा या विषयावर अधिक माहिती देत आहेत.

News18
News18
मुंबई : हिंदू धर्मात पितृपक्षाला विशेष महत्त्व आहे. हा संपूर्ण काळ पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आणि त्यांच्या आशीर्वादासाठी विशेष मानला जातो. पितृपक्षाच्या शेवटच्या दिवसाला सर्वपितृ अमावस्या म्हणतात. या दिवशी जो कोणी आपल्या पूर्वजांचे भक्ती आणि श्रद्धेने स्मरण करतो आणि दान, तर्पण किंवा श्राद्ध करतो त्याला अपार पुण्य मिळते आणि जीवनातील मोठी आव्हाने दूर होतात. यंदाची सर्वपितृ अमावस्या 21 सप्टेंबर रोजी आहे. या दिवशी शिवलिंगाला विशेष गोष्टी अर्पण केल्यानं पूर्वजांची कृपा मिळते, कुटुंबात शांती, आनंद आणि समृद्धी राहते. ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा या विषयावर अधिक माहिती देत आहेत.
सर्वपितृ अमावास्येचे महत्त्व - सर्वपितृ अमावस्या हा पितृ पक्षाचा शेवटचा दिवस आहे. तर्पण किंवा श्राद्धाद्वारे स्मरणात न राहिलेल्या सर्व पूर्वजांना आदरपूर्वक निरोप दिला जातो. असे मानले जाते की या दिवशी केलेले कर्म आणि दान थेट पूर्वजांपर्यंत पोहोचतं आणि त्यांच्या आशीर्वादामुळे कुटुंबातील त्रास कमी होतात. काही कारणास्तव पितृपक्षात श्राद्ध किंवा पिंडदान केले गेले नाही, तर या दिवशी तिलांजली अर्पण करून दान केल्याने पूर्वजांना शांती मिळते.
advertisement
दान, तर्पण आणि श्राद्धाची परंपरा - हिंदू परंपरेत तर्पण, पिंडदान आणि दानाचे खूप महत्त्व आहे. या दिवशी लोक पवित्र नद्या, तलाव किंवा इतर जलाशयांच्या काठावर तर्पण करतात. कुश गवत, तीळ, पाणी आणि धान्य वापरून पिंडदान केले जाते. ब्राह्मण आणि गरजूंना अन्न, कपडे, गूळ, तीळ आणि इतर आवश्यक वस्तू दान केल्या जातात. यामुळे पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळतेच, शिवाय कुटुंबालाही शुभ परिणाम मिळतात.
advertisement
शिवलिंगावर अर्पण करायच्या वस्तू -
1. गंगाजल आणि कच्चे दूध: शिवलिंगावर यांचं मिश्रण अर्पण केल्यानं पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते आणि पापं कमी होतात.
2. काळे तीळ आणि जव: शनी आणि पूर्वजांशी संबंधित त्रास असलेल्यांसाठी हे अर्पण विशेषतः फलदायी मानले जाते.
advertisement
3. बिल्व पान: 108 बिल्व पानं अर्पण करून प्रत्येकावर 'ओम' लिहिणे अत्यंत शुभ मानले जाते.
4. शमी पानं: शनिदेवांना प्रिय असलेली शमी पानं शिवलिंगावर अर्पण केल्याने पापं दूर होतात आणि शांती मिळते.
5. पांढरी फुले आणि तुपाचा दिवा: हे अर्पण केल्याने भगवान शिव आणि त्यांच्या कुटुंबाकडून आशीर्वाद मिळतो, घरात शांती आणि आनंद टिकतो.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Sarva Pitru Amavasya 2025: पितृऋण, पितृदोषातून मुक्त होण्यासाठी सर्वपित्री अमावस्येला शिवपिढींवर वाहा या गोष्टी
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement