Astrology: थोडा धीर धरा, शनि-शुक्र मदतीला धावून येणार! 17 जुलैपासून 3 राशींकडे अनपेक्षित पैसा, यश

Last Updated:

Shani Astro: शनिदेव सध्या गुरूच्या मीन राशीत आहेत. तिथून त्याची काही ग्रहाची युती किंवा दृष्टी पडत आहे. शनी दैत्यगुरु शुक्राशी युती करून पंचक योग बनवत आहे. या योगाच्या निर्मितीमुळे काही राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात प्रचंड यश आणि आर्थिक लाभ मिळू शकतो. जाणून घेऊया या भाग्यवान राशींबद्दल.

News18
News18
मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार न्यायाधीश शनी अतिशय मंद गतीने फिरतो. त्यामुळंच एका राशीत तो सुमारे अडीच वर्षे भ्रमण करत राहतो. त्यामुळे शनीचे शुभ किंवा अशुभ परिणाम खूप हळूहळू आणि खूप उशिरा मिळतात. शनिदेवाची महादशा, अंतरदशा किंवा साडेसाती-अडीचकी सुरू असते तेव्हा व्यक्तीला अनेक प्रकारचे दुःख आणि कष्ट सहन करावे लागतात.
शनिदेव सध्या गुरूच्या मीन राशीत आहेत. तिथून त्याची काही ग्रहाची युती किंवा दृष्टी पडत आहे. शनी दैत्यगुरु शुक्राशी युती करून पंचक योग बनवत आहे. या योगाच्या निर्मितीमुळे काही राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात प्रचंड यश आणि आर्थिक लाभ मिळू शकतो. जाणून घेऊया या भाग्यवान राशींबद्दल.
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, १७ जुलै रोजी सकाळी ८:०८ वाजता, शनि-शुक्र एकमेकांपासून ७२ अंशांच्या कोनात असतील, ज्यामुळे पंचक योग तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा दोन ग्रह एकमेकांपासून ७२ अंशांच्या कोनात स्थिर असतात, तेव्हा तो त्रिकोण दर्शवतो. यामुळे दोन्ही ग्रह एकमेकांशी सकारात्मक उर्जेची देवाणघेवाण करतात. शनी मीन राशीतून वक्री होणार आहे, ज्यामुळे तो अत्यंत बलवान असेल. दुसरीकडे, शुक्र देखील त्याच्या स्वतःच्या वृषभ राशीत आहे, ज्यामुळे काही राशींना बरेच फायदे मिळू शकतात.
advertisement
वृषभ - शनि-शुक्राचा पंचक योग या राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकतो. शनि या राशीच्या अकराव्या घरात वक्री स्थितीत आहे आणि शुक्र लग्नाच्या घरात आहे. अशा परिस्थितीत, या राशीच्या लोकांचे व्यक्तिमत्व सुधारू शकते. यासोबतच, आत्मविश्वास वाढू शकतो. दीर्घकालीन समस्या आणि तणाव कमी होऊ शकतात. अडकलेले काम पूर्ण होऊ शकते. कामाच्या ठिकाणी सुरू असलेल्या समस्या देखील संपू शकतात. तुमचे वर्चस्व वाढेल. प्रेम जीवनही चांगले जाणार आहे. वैवाहिक जीवनातही आनंद राहील.
advertisement
मकर - या राशीच्या लोकांसाठी शनि-शुक्राचा पंचक योग अनेक क्षेत्रात फलदायी ठरू शकतो. या राशीत शुक्र पाचव्या भावात आणि शनि तिसऱ्या भावात वक्री स्थितीत आहे. अशा परिस्थितीत या राशीचे लोक अध्यात्माकडे झुकू शकतात. तुम्ही कुटुंब किंवा मित्रांसह धार्मिक स्थळाला भेट देऊ शकता. कुटुंबासोबत तुमचा चांगला वेळ जाईल. विद्यार्थ्यांसाठीही हा काळ फायदेशीर ठरू शकतो. या राशीच्या लोकांना नवीन गोष्टी शिकायला मिळू शकतात. व्यवसायाच्या क्षेत्रातही तुम्हाला फायदा होऊ शकतो. तुम्हाला मोठी ऑर्डर मिळू शकते. भावंडांशी चांगले संबंध राहतील.
advertisement
कर्क - शनी-शुक्राचा पंचक योग या राशीच्या लोकांसाठी भाग्यवान ठरू शकतो. या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात प्रचंड यश तसेच भरपूर पैसे मिळू शकतात. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ भाग्यवान ठरू शकतो. तुमच्या मेहनती आणि समर्पणाचे चांगले फळ मिळू शकते. आपल्यावर मोठी जबाबदारी सोपवली जाईल. व्यवसायाबाबत तुम्ही मोठा निर्णय घेऊ शकता. शारीरिक समस्या थोड्या कमी होऊ शकतात. जीवनात भरपूर आनंद मिळू शकेल.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
advertisement
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Astrology: थोडा धीर धरा, शनि-शुक्र मदतीला धावून येणार! 17 जुलैपासून 3 राशींकडे अनपेक्षित पैसा, यश
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement