Kartik Purnima 2025: कार्तिकी पौर्णिमेला केलेले हे उपाय फळ देतात; श्रीहरी पांडुरंगाची कृपा कुटुंबाला
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Kartik Purnima 2025: हिंदू धर्मात एक प्रसिद्ध कथा आहे की, भगवान शंकरानं याच दिवशी तीन असुरांचा नाश केला होता, जे वेगवेगळ्या लोकांमध्ये दहशत पसरवत होते. या तिन्ही असुरांचा (त्रिपुरांचा) नाश झाल्यानंतर शंकराची महती आणि पूजेचं महत्त्व आणखी वाढलं, आणि हा दिवस...
मुंबई : कार्तिक पौर्णिमा ही हिंदू धर्मातील प्रमुख आणि पवित्र पौर्णिमा तिथींपैकी एक मानली गेली आहे. या दिवसाला त्रिपुरारी पौर्णिमा या नावानंही ओळखलं जातं. याचं मुख्य कारण म्हणजे, या दिवशी भगवान विष्णूंसोबतच भगवान शिवाचीसुद्धा विशेष पूजा-अर्चा केली जाते. हिंदू धर्मात एक प्रसिद्ध कथा आहे की, भगवान शंकरानं याच दिवशी तीन असुरांचा नाश केला होता, जे वेगवेगळ्या लोकांमध्ये दहशत पसरवत होते. या तिन्ही असुरांचा (त्रिपुरांचा) नाश झाल्यानंतर शंकराची महती आणि पूजेचं महत्त्व आणखी वाढलं, आणि हा दिवस त्रिपुरारी पौर्णिमा या नावानं प्रसिद्ध झाला.
गंगा स्नानाचं आणि देव दिवाळीचं महत्त्व - कार्तिक पौर्णिमेचं आणखी एक प्रमुख धार्मिक महत्त्व म्हणजे गंगा स्नान. कार्तिक महिन्यात गंगा स्नान केल्यानं सगळ्या पापांचा नाश होतो आणि मोक्ष मिळतो, असं मानलं गेलं आहे. या दिवशी स्वर्गलोकातून देवी-देवतासुद्धा गंगा स्नानासाठी पृथ्वीवर येतात, अशी श्रद्धा आहे. यासोबतच, या दिवशी देव दिवाळीसुद्धा साजरी केली जाते. देव या दिवशी पृथ्वीवर येऊन दिवे लावतात आणि असुरांवर विजय मिळवल्याचा आनंद साजरा करतात, अशी धार्मिक मान्यता आहे. गंगेत स्नान सर्वांनाच शक्य नसल्यानं अंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळावे.
advertisement
गुरुनानक जयंती - या व्यतिरिक्त कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी शिखांचे पहिले गुरु, गुरुनानक यांचा जन्म झाला होता. शीख धर्मात हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी शीख समुदाय गुरुद्वारांमध्ये अरदास करतो, कीर्तन करतो आणि प्रभूच्या नावाचा जप करत असतो.
कार्तिक पौर्णिमा कधी आहे?
२०२५ मध्ये कार्तिक पौर्णिमा ५ नोव्हेंबर रोजी साजरी केली जाईल. तिथीची सुरुवात ४ नोव्हेंबर रोजी रात्री १०:३६ वाजता होईल, दुसऱ्या दिवशी ५ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६:४८ वाजेपर्यंत राहील. सूर्योदयाची तिथी महत्त्वाची मानली गेली आहे आणि पौर्णिमा तिथी ५ नोव्हेंबरला सूर्योदयानंतरही राहणार आहे, म्हणूनच ५ नोव्हेंबर रोजी कार्तिक पौर्णिमेचा उत्सव साजरा केला जाईल.
advertisement
गंगा स्नान आणि पूजेचा शुभ मुहूर्त - गंगा स्नानाचा मुहूर्त सकाळी ०४:५२ वाजल्यापासून ते सकाळी ०५:४४ वाजेपर्यंत राहील. तर, पूजेचा मुहूर्त सकाळी ०७:५८ वाजल्यापासून ते सकाळी ०९:२० वाजेपर्यंत राहील. प्रदोषकाळात देव दिवाळीचा मुहूर्त संध्याकाळी ०५:१५ वाजल्यापासून ते रात्री ०७:०५ वाजेपर्यंत असेल. चंद्रोदय संध्याकाळी ५:११ वाजता होईल.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 26, 2025 2:10 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Kartik Purnima 2025: कार्तिकी पौर्णिमेला केलेले हे उपाय फळ देतात; श्रीहरी पांडुरंगाची कृपा कुटुंबाला


