अनोख्या योगामध्ये हिंदू नववर्षाची सुरुवात, या 5 राशीच्या लोकांची होणार चांदी, तुमची रास यात आहे का?
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
अशा स्थितीत मीन राशीमध्ये राहू आणि सूर्याचा संयोगही तयार होत आहे. संपूर्ण वर्षभर राहू मीन राशीत भ्रमण करेल आणि त्याच्या या प्रभावामुळे 5 राशीच्या लोकांचे नशिब बदलणार आहे.
सर्वेश श्रीवास्तव
अयोध्या : हिंदू पंचांगानुसार 9 एप्रिलपासून हिंदू नव वर्ष संवत 2081 सुरू होणार आहे. ज्योतिष गणनेनुसार, या वर्षीचा राजा मंगळ आणि मंत्री शनी असेल. मात्र, संपूर्ण वर्ष राहू ग्रहाची स्थिती काय असेल, संपूर्ण 12 राशीच्या लोकांवर याचा कसा प्रभाव पडेल, हे तुम्हाला माहितीये का? याचबाबत लोकल18 च्या टीमने विशेष आढावा घेतला.
advertisement
येणारे नवीन हिंदू वर्षात सर्व 12 राशींवर राहूची दृष्टी कशी असेल आणि कोणत्या राशीच्या लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे, तसेच कोणत्या राशीच्या लोकांना राहूची विशेष कृपा असणार आहे, हे जाणून घेऊयात.
अयोध्येतील ज्योतिषी पंडित कल्कि राम यांनी याबाबत माहिती दिली. लोकल18 बोलताना त्यांनी सांगितले की, ज्योतिषीय गणनेनुसार, हिंदू नववर्षाच्या सुरुवातीला सूर्य मीन राशीत असेल. याठिकाणी राहु आधीच आहे. अशा स्थितीत वर्षाची सुरुवात ग्रहण योगात होत आहे. विक्रम संवत 2081 ची सुरुवात सूर्यग्रहणासोबतच ग्रहण योगाने होत आहे, हा देखील योगायोग आहे, असे ते म्हणाले.
advertisement
त्यामुळे अशा स्थितीत मीन राशीमध्ये राहू आणि सूर्याचा संयोगही तयार होत आहे. संपूर्ण वर्षभर राहू मीन राशीत भ्रमण करेल आणि त्याच्या या प्रभावामुळे 5 राशीच्या लोकांचे नशिब बदलणार आहे. राहूच्या प्रभावामुळे 5 राशीचे लोक धनवान होऊ शकतात. त्या 5 राशी कोणत्या, आता ते जाणून घेऊयात.
advertisement
मेष राशी : मेष राशीच्या लोकांवर राहूची विशेष कृपा वर्षभर राहील. तसेच कमाईच्या अनेक शुभ संधीही मिळतील. करिअर आणि व्यवसायात यश मिळेल. यासोबतच आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. तसेच वैवाहिक जीवनात आनंद मिळेल.
कन्या राशी : कन्या राशीच्या लोकांना प्रत्येक कार्यात यश मिळेल. परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. जीवनसाथीसोबत चांगला वेळ जाईल. धार्मिक कार्यात आवड निर्माण होईल. व्यापारात वाढ होईल. नोकरीत पदोन्नती मिळेल.
advertisement
तूळ राशी : या राशीच्या लोकांसाठी हे वर्ष आर्थिक लाभ देणारे आहे. आरोग्याचेही प्रश्न दूर होतील. वाहन अथवा घर खरेदी कराल. कुटुंबात आनंद निर्माण होईल.
वृश्चिक राशी : वृश्चिक राशीच्या लोकांसाठी ही वेळ अत्यंत चांगली राहणार आहे. जीवनात चांगल्या प्रकारचा योग निर्माण होईल. सर्व मनोकामना पूर्ण होतील. लव्ह लाइफही यावर्षी चांगले राहील.
advertisement
धनु राशी : या राशीच्या लोकांवर या वर्षी राहुची कृपा असेल. थांबलेली कामे पूर्ण होतील. जमिनीशी संबंधित प्रकरणात यश मिळेल. नवीन व्यवसाय सुरू करू शकतात. संतती प्राप्तीचे सुख मिळू शकते.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती राशी-धर्म आणि शास्त्रांच्या आधारावर ज्योतिषाचार्य आणि आचार्यांशी संवाद साधून लिहिली गेली आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. याबाबत लोकल18 कोणत्याही गोष्टीचे समर्थन करत नाही. तसेच कोणताही दावा करत नाही.
Location :
Ayodhya,Faizabad,Uttar Pradesh
First Published :
April 06, 2024 12:15 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
अनोख्या योगामध्ये हिंदू नववर्षाची सुरुवात, या 5 राशीच्या लोकांची होणार चांदी, तुमची रास यात आहे का?