Astrology: अडचणींना तुमच्या जवळही फिरकू देत नाहीत रत्न, त्यांचे खरे अर्थ माहित आहे का?

Last Updated:

रत्नशास्त्र हे भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचे शास्त्र आहे. ज्यामध्ये ग्रहांच्या प्रभावामुळे येणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी विविध रत्नांचा वापर करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.

+
आपल्या

आपल्या राशी प्रमाणे परिधान करा हे रत्न नक्कीच होईल यश प्राप्ती.

कुणाल दंडगव्हाळ, प्रतिनिधी
नाशिक : रत्नशास्त्र हे भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचे शास्त्र आहे. ज्यामध्ये ग्रहांच्या प्रभावामुळे येणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी विविध रत्नांचा वापर करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. प्रत्येक रत्नाला एक विशिष्ट ग्रहाशी जोडलेले आहे आणि ही रत्ने योग्य पद्धतीने परिधान केल्याने जीवनातील अनेक अडचणी दूर होतात.  आपल्याला सर्वांना 12 प्रकारची रत्ने माहिती आहेत. परंतु 12 रत्नांच्या व्यतिरिक्त शास्त्रात 84 प्रकारचे विविध रत्न आहेत. यापैकीच 33 रत्नांची माहिती नाशिक येथील धर्म अभ्यासक डॉ. नरेंद्र धारणे यांनी दिली आहे. 
advertisement
कोणते आहेत रत्न?
1. माणिक – याला माणिक्य असेही म्हणतात. काही माणिक हे लाल रंगाचे तर काही माणिक गुलाबी रंगाचे, आकाशी, शामल रंगाचे असतात.
2. मोती – मोती हे जलजन्य रत्न आहे. पाण्यातील प्राण्यापासून तयार होते. म्हणून प्राणीजन्य पांढरे पिवळे, लाल, काळ्या रंगाचे मोती सापडतात.
advertisement
3. प्रवाळ – याला पोवळे असेही म्हणतात. हेही जलजन्य रत्न आहे. प्रवाळ लाल, शेंदरी सफेद इत्यादी रंगात सापडतो.
4. पाचू – पाचू या रत्नाचा रंग हिरवा असतो. हे खनिजजन्य आहे. इतर रत्नांपेक्षा हे ठिसूळ आहे.
5. पुष्कराज – अतिशय लोकप्रिय खनिजरत्न आहे. याला पुष्कराज असेही म्हणतात.
advertisement
6. हिरा – अतिशय मौल्यवान रत्न, पांढऱ्या रंगाचे असते. तसेच पिवळ्या, काळ्या लाल, गुलाबी रंगामध्येही सापडते.
7. नीलम - याला नीलमणी असंही म्हणतात. निळ्या रंगाचे किंवा मोराच्या मानेच्या निळ्या रंगासारखे दिसते.
advertisement
8. गोमेद – या रत्नाला गोमेदक असेही म्हणतात. याचा रंग गायीच्या गोमुत्रासारखा किंवा मधासारखा असतो.
9. वैडूर्य – याला सुत्रमणी, लसण्या असे म्हणतात. मांजरीच्या डोळ्यासारखे हे रत्न दिसते. त्याच्या पृष्टभागावर 1 ते 3 सफेद रेषा असतात. त्यांना तेजाचे पट्टे असे म्हणतात.
advertisement
10. लालडी – हे माणिक परीवारातील रत्न असून याचा रंग गुलाबाच्या रंगासारखा असतो. हे माणिकाचे उपरत्न होय. याला स्पायनल असे म्हणतात.
11. फिरोजा – हे रत्न आकाशी रंगाचे असून अपारदर्शक असते. हे अल्पमोली रत्न आहे.
12. तुरमली – हे रत्न सर्व रंगामध्ये सापडते. याचा स्पर्श मुलायम असून हे ठिसूळ रत्न आहे.
advertisement
13. ओपल – याला उपल असेही म्हणतात. सर्वात सुंदर आणि देखणे असे हे रत्न आहे. या रत्नावर इंद्रधनुष्याचे रंग बघावयास मिळतात. 
14. पेरीडॉट – भारतीय लोक जबरदस्त घृतमणी या नावाने ओळखतात. स्फटिकाप्रमाणे हे रत्न पारदर्शक असून अल्पमोली रत्न आहे.
15. गौंदता – हे रत्न गाईच्या दातासारखे असून सफेद रंगात पिवळसर झाक असते. या रत्नावर उभ्या आडव्या रेषाही असतात.
16. सितारा – हे रत्न भगव्या रंगाचे असून त्यावर सोनेरी रंगांचे ठिपके असतात.
17. रौमनी – हे गडद लाल रंगाचे रत्न असून थोडा काळसर रंग दृष्यमान होत असतो.
18. नरम – रौमनीप्रमाणेच लाल रंगाचे असून काळ्या रंगाची झाक दिसून येते. रोमनी हे रत्न जड असून नरम हे रत्न वजनाला हलके असते. परंतु रौमनीपेक्षा चांगले दिसते.
19. सुलेमानी – शामल रंगाचे, काही रत्ने काळ्या रंगाची असून त्यांच्यावर उभ्या पांढऱ्या रेषा दिसतात.
20. जजेमानी – हे सुलेमानी रत्नांच्या जातीतले असून याचा रंग धुसर पांढरा असतो. यावर गडद सफेद रंगाच्या रेषा असतात.
21. आबरी – हे काळ्या रंगाचे खनिज असून अल्पपारदर्शक आहे.
22. हजरते उद – हे काळ्या रंगाचे रत्न असून यापासून नेत्रविकारावर औषध तयार करतात.
23. पनधन – हे काळ्या रंगाचे रत्न असून यात किंचित हिरवा रंग असतो.
24. डूर/कूर – हे कथिलाच्या रंगाचे रत्न असून यापासून वनऔषधी आणि भस्म कुटण्याकरीता लागणारा खलबत्ता तयार करतात.
25. पाराजहर – हे पांढऱ्या रंगाचे रत्न असून हे रत्न जखमेवर लावल्यास जखम लवकर बरी होते.
26. चित्ती / चित्रि – हे रत्न काळ्या रंगाचे असते आणि त्यावर सोनेरी रंगांची रेषा असते.
27. हालन/हालत – हे गुलाबी रंगाचे रत्न आहे. हे रत्न हलविल्यास त्यातील रंग हालताना दिसतो.
28. खात – या रत्नातील काही प्रकार लाल तर काही प्रकार निळया रंगाचे असतात. उष्णतेच्या विकारावर औषधी म्हणून उपोयोगी आहे.
29. सोहन मक्खी/मकवी – याचा रंग पांढऱ्या रेतीसारखा असून हे रत्न अपारदर्शक आहे याचा उपयोग मुत्रविकारावर औषधी म्हणून केला जातो.
30. पारसमणी – लोखंड्याचे सोन्यात रुपांतर करणारे हे रत्न. अतिदुर्लभ याला परीस असंही म्हटले जाते.
31. जहरमोहरा – पांढऱ्या रंगात हिरवी किंवा हिरव्या रंगात पांढरी झाक या रत्नात असते. या रत्नांच्या पेल्यात विष जरी टाकले तरी विषारीपणा नाहीसा होतो.
32. मकनातीस – सफेद किंवा किंचित काळ्या रंगाचे हे रत्न असून गारगोटीसारखे दिसते. अग्नी प्रज्वलित करण्यास उपयुक्त.
33. मरगज – हे रत्न हिरव्या रंगांचे असते. परंतु चमक दिसत नाही.
या पद्धतीने हे रत्न शास्त्र शुद्ध पद्धतीने आपल्या जन्म कुंडली अथवा राशीनुसार परिधान केल्यास आपल्या दैनंदिन जीवनात नक्की प्रभाव पडत असल्याचे नरेंद्र धरणे यांनी सांगितले आहे. 
सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Astrology: अडचणींना तुमच्या जवळही फिरकू देत नाहीत रत्न, त्यांचे खरे अर्थ माहित आहे का?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement