शनी दोष घालवण्यासाठी मोठी संधी! दसऱ्याच्या दिवशी हे उपाय करा, साडेसाती जाणारच
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Shani Sade Sati 2025 : हिंदू धर्मातील विजयादशमी म्हणजेच दसरा. हा केवळ सण नसून वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक मानला जातो. दरवर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दशमी तिथीला हा सण साजरा केला जातो.
मुंबई : हिंदू धर्मातील विजयादशमी म्हणजेच दसरा (Dussehra 2025) हा केवळ सण नसून वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक मानला जातो. दरवर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दशमी तिथीला हा सण साजरा केला जातो. या दिवशी रावण दहनाची परंपरा पाळली जाते. धार्मिक ग्रंथांनुसार, दसऱ्याचा दिवस हा नव्या कार्याची सुरुवात करण्यासाठी, अपशकुन दूर करण्यासाठी आणि शुभ फलप्राप्तीसाठी अत्यंत मंगल मानला जातो. विशेष म्हणजे, ज्या लोकांच्या कुंडलीत शनी संबंधित दोष (Shani Dosh) आहेत त्यांच्यासाठी हा दिवस अत्यंत उपयुक्त ठरतो. शनीच्या अशुभ परिणामांना दूर करण्यासाठी काही खास उपाय सांगितले गेले आहेत.
शमी वृक्षाची पूजा
ज्योतिषशास्त्रानुसार, ज्या व्यक्तींच्या कुंडलीत शनी दोष आहे त्यांनी दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा करावी. घराच्या ईशान्य (उत्तर-पूर्व) दिशेला शमीचं रोप लावणंही शुभ मानलं जातं. या उपायामुळे शनीची क्रूर दृष्टी कमी होते आणि घरात शांती व समृद्धी नांदते.
हनुमानाची उपासना
शनी दोष दूर करण्यासाठी भगवान हनुमानाची पूजा करणे हे सर्वात प्रभावी मानले जाते. दसऱ्याच्या दिवशी विशेषतः हनुमान चालीसाचे पठण करावे. श्रद्धेने केलेल्या या उपासनेमुळे शनीची पीडा कमी होते आणि मानसिक व शारीरिक बळ वाढते.
advertisement
मोहरीच्या तेलाचा दिवा
शनीची साडेसाती किंवा ढैय्याचा त्रास असलेल्या लोकांसाठी दसऱ्याचा दिवस विशेष महत्त्वाचा आहे. या दिवशी संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्यास शनीच्या कष्टातून मुक्ती मिळते, असे मानले जाते. हा उपाय सातत्याने केल्यास दीर्घकाळासाठी लाभ मिळतो.
नारळाचा उपाय
हिंदू परंपरेत नारळाला शुभ मानले जाते. दसऱ्याच्या दिवशी रावण दहनाच्या वेळी पाणी असलेला नारळ आपल्या डोक्यावरून २१ वेळा उतरवून दूर फेकावा. या क्रियेला ‘उतरवणे’ असे म्हटले जाते. असा विश्वास आहे की या उपायामुळे शनी दोष कमी होतो आणि संकट दूर होतात.
advertisement
रामचरितमानस वाचन
धार्मिक ग्रंथ वाचनालाही दसऱ्याच्या दिवशी विशेष महत्त्व आहे. शनी दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी या दिवशी घरी बसून सुंदरकांड किंवा रामचरितमानसचे पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते. घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि शनीच्या नकारात्मक प्रभावापासून बचाव होतो.
(सदर बातमी फक्त माहिती करिता असून न्यूज १८ मराठी कुठलाही दावा करत नाही)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 01, 2025 1:57 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
शनी दोष घालवण्यासाठी मोठी संधी! दसऱ्याच्या दिवशी हे उपाय करा, साडेसाती जाणारच