हिवसाळा की उकाडा? ऑक्टोबर महिन्यात कसा राहणार वातावरण, IMD कडून अलर्ट
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रात अवकाळी पाऊस आणि उकाडा वाढणार, मुंबई कोकणात हलक्या सरी, विदर्भात यलो अलर्ट, ला निनामुळे थंडी जास्त, दिवाळीत प्रदूषण वाढण्याची शक्यता.
मुंबई: मान्सूनचा शेवटचा पाऊस 30 सप्टेंबर रोजी झाला. त्यानंतर आता मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. असं असलं तरी ऑक्टोबर महिन्यात पाऊस राहणार आहे. तो अवकाळी पाऊस असेल असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यंदा सरासरीपेक्षा अति पाऊस झाला आहे. ला निनामुळे यंदा थंडी देखील जास्त राहण्याची शक्यता आहे. त्याआधी हवामान विभागाने ऑक्टोबर महिना कसा असेल हिवाळा, पावसाळा की उकाडा याची अपडेट दिली आहे.
ऑक्टोबर महिन्यात हवामान विभागाच्या म्हणण्यांनुसार काही ठिकाणी अवकाळी पाऊस राहण्याची शक्यता आहे. मात्र हा पाऊस असेल तरीसुद्धा त्यासोबत रात्रीचा उकाडा देखील वाढू शकतो. रात्री तापमान वाढ जास्त होऊ शकते. दिवाळीमुळे फुटाके फोडले जातात, त्यात तापमान वाढ आणि प्रदूषण यामुळे हवामान अधिक खराब होईल.
ऑक्टोबर महिन्यात कुठे राहणार जास्त तापमान?
नुकत्याच जारी केलेल्या अंदाजानुसार देशाच्या अनेक भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे. ऑक्टोबरमध्ये पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बहुतांश भागात पुन्हा एकदा पाऊस होईल अशी शक्यता व्यक्त केली आहे. ऑक्टोबरमध्ये देशाच्या बहुतांश भागांत जास्तीत जास्त तापमान सामान्य ते सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.याला अपवाद म्हणून ईशान्य आणि संलग्न पूर्व भारत, पश्चिम हिमालयीन राज्ये आणि सौराष्ट्र व कच्छ इथे सर्वात जास्त तापमान राहू शकतं.
advertisement
Probabilistic Forecast of Temperatures over the Country during October 2025.
Warmer nights possibility... Need to watch. TC please.
This could lead to additional power consumptions especially in urban areas.@MinOfPower @MoHFW_INDIA pic.twitter.com/L0J5OJzvqO
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 30, 2025
advertisement
महाराष्ट्रात कसं राहणार तापमान?
महाराष्ट्रात पाऊस आणि उष्णता असं एकत्र वातावरण राहण्याची शक्यता आहे. रात्री उकाडा वाढू शकतो. घामाच्या धारा लागण्याची शक्यता आहे. उकाडा वाढणार आहे. दमट उष्ण हवामान यामुळे ऑक्टोबर हैराण करू शकतो. महाराष्ट्रात 10 ऑक्टोबरपर्यंत कमी अधिक अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे.
कुठे राहणार पाऊस?
ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये पाऊस राहणार आहे. मुंबई आणि कोकणात हलक्या सरी बरसतील. तर उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांत 5 ऑक्टोबरपर्यंत पाऊस राहणार आहे. हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. यंदा दसऱ्यालाही जोरदार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज आहे. नागपूरसह विदर्भाला पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाचा अंदाज आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 01, 2025 1:48 PM IST