शिवनगरी काशीवरून गंगाजल घरी आणू नये, अन्यथा मिळेल अनिष्ठ फळ; काय आहे रहस्य?
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
हिंदू धर्मात गंगा नदीला केवळ नदी मानले जात नाही, तर तिला माता मानून तिची पूजा केली जाते. गंगा नदीचे पाणी, म्हणजेच गंगाजल, प्रत्येक धार्मिक विधी आणि शुभ कार्यात अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
Mumbai : हिंदू धर्मात गंगा नदीला केवळ नदी मानले जात नाही, तर तिला माता मानून तिची पूजा केली जाते. गंगा नदीचे पाणी, म्हणजेच गंगाजल, प्रत्येक धार्मिक विधी आणि शुभ कार्यात अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. अनेक भाविक मोठ्या श्रद्धेने गंगाजल घरी आणतात. विशेष म्हणजे, गंगा नदी वाराणसी (काशी) शहरातून वाहत असूनही, बहुतांश भाविक गंगाजल आणण्यासाठी हरिद्वारला प्राधान्य देतात. यामागे काय कारण आहे आणि नेमके सत्य काय आहे, याबाबत अनेक भाविकांच्या मनात संभ्रम असतो. धर्मशास्त्र आणि धार्मिक तज्ज्ञांच्या मते, या परंपरेमागे भौगोलिक, ऐतिहासिक आणि शुद्धतेची महत्त्वपूर्ण कारणे दडलेली आहेत. तसेच अध्यात्मिक कारणे देखील आहेत.
गंगाजल हरिद्वारमधून का नेले जाते?
हरिद्वार हे गंगा नदीच्या उगमस्थानाच्या तुलनेने जवळ आहे. त्यामुळे हरिद्वारमध्ये गंगेचे पाणी अधिक शुद्ध, निर्मळ आणि अपवित्रतेपासून मुक्त मानले जाते. त्याच प्रमाणे इथल्या पाण्याची स्थिती बरेच लोक शुद्ध मानतात ज्यामुळे गंगाजल घेऊन जाण्यासाठी हरिद्वार हे योग्य ठिकाण मानले जाते. हरिद्वारमध्ये गंगा नदी पर्वतांतून मैदानी प्रदेशात प्रवेश करते. येथील पाण्याचा प्रवाह अतिशय वेगवान आणि थंड असतो, ज्यामुळे पाणी नैसर्गिकरित्या स्वच्छ राहते. पण हे झालं भौगोलिक कारण. या मागे आणखी काही कारणं देखील आहेत.
advertisement
पौराणिक कथेनुसार हरिद्वारचे महत्व
हरिद्वार हे 'हरिचे द्वार' मानले जाते आणि हे ठिकाण प्राचीन काळापासून तीर्थक्षेत्रासाठी प्रसिद्ध आहे. येथेच देव, दानव आणि मानवांनी एकत्र येऊन अमृत प्राशन केले होते, अशी धार्मिक मान्यता आहे. त्यामुळे येथील जल अधिक पवित्र मानले जाते. वैज्ञानिक दृष्ट्याही, हरिद्वार आणि त्याच्या वरच्या भागात गंगेच्या पाण्यात गंधकाचे प्रमाण आणि विशिष्ट खनिजे अधिक प्रमाणात आढळतात, ज्यामुळे पाणी नैसर्गिकरित्या जास्त काळ शुद्ध राहते. अनेक भाविक हरिद्वार, गंगोत्री किंवा गोमुख येथूनच गंगाजल आणतात. या परंपरेमुळे हरिद्वारहून गंगाजल आणण्याची प्रथा अधिक प्रचलित झाली.
advertisement
advertisement
काशीमधून गंगाजल का घेऊन जावू नये?
view commentsअनेकांचा असा विश्वास आहे की गंगाजल काशी मधून घेऊन जाऊ नये. महादेवाची नगरी 'काशी' ही मोक्ष (मुक्ती) करीता प्रसिद्ध आहे. असं मानलं जात की इथे काशीमध्ये मृत्यू झाला तर मोक्ष नक्की मिळते. काशीमध्ये असलेल्या गंगेत मृत्य व्यक्तींची राख वाहिली जाते. असं मानलं जात की काशीमध्ये कोणताही जीवजंतू, व्यक्ती जर त्याचे प्राण त्यागतो तर त्याला जीवन आणि मृत्यू या चक्रातून मुक्ती मिळते. आणि काशी जवळ असलेल्या गंगेत मृत व्यक्तींची राख मिसळली जाते म्हणून इथलं पाणी (गंगाजल) घरी घेऊन जावू असे मानले जाते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 06, 2025 3:54 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
शिवनगरी काशीवरून गंगाजल घरी आणू नये, अन्यथा मिळेल अनिष्ठ फळ; काय आहे रहस्य?


