Hero ची नवी पॅशन प्लस मार्केटमध्ये, पहा या बाईकमध्ये काय आहे खास 

Last Updated:

हिरो मोटोकॉर्पने त्यांच्या लोकप्रिय एंट्री लेव्हल बाईक पॅशन प्लसचे 2025 मॉडेल बाजारात लाँच केले आहे. आता या बाईकचे इंजिन OBD-2B उत्सर्जन मानकांचे पालन करण्यासाठी अपडेट करण्यात आले आहे.

पॅशन प्लस
पॅशन प्लस
मुंबई : देशातील सर्वात मोठी दुचाकी कंपनी हिरो मोटोकॉर्पने त्यांच्या लोकप्रिय एंट्री लेव्हल बाईक पॅशन प्लसचे 2025 मॉडेल बाजारात लाँच केले आहे. आता या बाईकचे इंजिन OBD-2B उत्सर्जन मानकांचे पालन करण्यासाठी अपडेट करण्यात आले आहे. ज्यामुळे बाईक चांगले मायलेज देण्यास, चांगली कामगिरी करण्यास आणि प्रदूषण कमी करण्यास मदत करेल. अपडेटेड पॅशन प्लस पूर्वीप्रमाणेच एकाच (i3S ड्रम सेल्फ स्टार्ट अलॉय) व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ही बाईक 4 रंगांमध्ये उपलब्ध आहे - ब्लॅक हेवी ग्रे आणि ब्लॅक नेक्सस ब्लू, स्पोर्ट रेडऐवजी ब्लॅक ग्रे स्ट्राइप आणि ब्लूश टील आणि स्पोर्ट्स रेड ब्लॅक.
नवीन पॅशन प्लसची फीचर्स   
नवीन पॅशन प्लसच्या फीचर्सविषयी बोलायचे झाले तर, लांबी 1,982mm मिमी, रुंदी 770mm आणि उंची 1,087mm, व्हीलबेस 1235mm आणि ग्राउंड क्लीयरन्स 168mm आहे. ही बाईक डबल क्रेडल फ्रेमवर बांधली आहे. यात इंटिग्रेटेड ब्रेकिंग सिस्टम (IBS), फ्रंट टेलिस्कोपिक फोर्क, मोबाईल चार्जिंग पोर्ट आणि युटिलिटी बॉक्स सारखी फीचर्स आहेत. एंट्री-लेव्हल कम्युटर सेगमेंट बाईक असल्याने, त्यात मूलभूत फीचर्स आहेत. बाईकचे कर्ब वेट 115 किलो आहे आणि तिची फ्यूल टँक क्षमता 11 लिटर आहे. याशिवाय, सीटची उंची 790mm ठेवण्यात आली आहे. ही डेली वापरासाठी चांगली बाईक ठरू शकते. ई बाईकची रचना थोडी स्पोर्टी आहे. ही बाईक फॅमिली क्लाससाठी व्हॅल्यू फॉर मनी ठरु शकते.
advertisement
इंजिन आणि पॉवर
2025 पॅशन प्लसमध्ये 97.2cc, सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिन आहे. हे इंजिन अपडेटेड OBD-2B उत्सर्जन आणि इंधन-इंजेक्शन तंत्रज्ञानासह येते. ते 7.91bhp पॉवर आणि 8.05Nm टॉर्क निर्माण करते. ट्रान्समिशन सुलभ करण्यासाठी इंजिनमध्ये 4-स्पीड गिअरबॉक्स आणि वेट मल्टी-प्लेट क्लच जोडलेले आहे. या बाईकमध्ये 18 इंचाचे टायर आणि ड्रम ब्रेकची सुविधा आहे. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, नवीन पॅशन प्लसची एक्स-शोरूम किंमत 82,016 रुपये आहे.
मराठी बातम्या/ऑटो/
Hero ची नवी पॅशन प्लस मार्केटमध्ये, पहा या बाईकमध्ये काय आहे खास 
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement