भारतीय कंपनीची 'ही' बाइक तब्बल 20 देशांमध्ये नंबर 1 वर, महाराष्ट्रात आहे खास ऑफर

Last Updated:

भारतात सर्वाधिक बाईक उत्पादक कंपनी असलेल्या  बजाज ऑटो लिमिटेडने नवा रेकॉर्ड केला आहे. अलीकडे बजाज कंपनीने आपला रिपोर्ट जाहीर केला

News18
News18
मुंबई :  भारतात सर्वाधिक बाईक उत्पादक कंपनी असलेल्या  बजाज ऑटो लिमिटेडने नवा रेकॉर्ड केला आहे. अलीकडे बजाज कंपनीने आपला रिपोर्ट जाहीर केला आहे. यामध्ये कंपनीचा सर्वात लोकप्रिय मोटरसायकल ब्रँड, बजाज पल्सरने २ कोटी युनिट्सचा विक्रीचा टप्पा ओलांडला आहे. कंपनीने ५० हून अधिक वेगवेगळ्या मार्केटमध्ये ही बाईक विकून हा टप्पा ओलांडला आहे. या विक्रमी सेलनंतर कंपनीने बजाज पल्सवर ७,३०० रुपयांपर्यंत सूट देण्याची ऑफर आणली आहे.
२००१ मध्ये लाँच झालेल्या पल्सर मालिकेनं १७ वर्षांत (२००१-२०१८) १ कोटी विक्रीचा टप्पा ओलांडला, तर पुढील १ कोटी युनिट्स फक्त ६ वर्षांत (२०१९-२०२५) विकल्या गेल्या. कंपनीच्या अधिकृत पत्रक प्रसिद्ध केलं आहे. पल्सर सध्या २० हून अधिक देशांमध्ये अव्वल स्थानावर आहे. ज्यामध्ये लॅटिन अमेरिका, दक्षिण आशिया आणि मध्य पूर्वेतील प्रमुख मार्केटमध्ये समावेश आहे.  "५०+ देशांमध्ये २ कोटींचा टप्पा ओलांडणे हे आमच्या ग्राहकांच्या विश्वासाचे आणि निष्ठेचे प्रतीक आहे. हा टप्पा गाठल्यानंतर एप्रिलमध्ये निवडक पल्सर मॉडेल्सवर विशेष अशी ऑफर देत आहोत, अशी माहिती बजाज ऑटो लिमिटेडच्या मोटरसायकल बिझनेस युनिटचे अध्यक्ष सारंग कानडे यांनी दिली.
advertisement
पल्सरच्या या सिरीजवर आहे ऑफर
पल्सर १२५ निऑन – ८४,४९३ रुपये (बचत: १,१८४ रुपये)
पल्सर १२५ कार्बन फायबर – ९१,६१० रुपये (बचत: २,००० रुपये)
पल्सर १५० सिंगल डिस्क – १,१२,८३८ रुपये (बचत: ३,००० रुपये)
पल्सर १५० ट्विन डिस्क – १,१९,९२३ रुपये (बचत: ३,००० रुपये)
पल्सर एन१६० यूएसडी – १,३६,९९२ रुपये (बचत: ५,८११ रुपये)
advertisement
पल्सर २२०एफ – ७,३७९ रुपयांची बचत (फक्त महाराष्ट्र, बिहार आणि पश्चिम बंगाल)
वेगवेगळ्या प्रकारच्या रायडर्सच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पल्सर मोटरसायकली १२५ सीसी ते ४०० सीसी प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत. बजाज ऑटो सतत आपली उपस्थिती वाढवत आहे. पल्सर ही जागतिक स्पोर्ट्स बाइकिंग सेगमेंटमध्ये सर्वाधिक पसंतीची गाडी राहिली आहे.
मराठी बातम्या/ऑटो/
भारतीय कंपनीची 'ही' बाइक तब्बल 20 देशांमध्ये नंबर 1 वर, महाराष्ट्रात आहे खास ऑफर
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement