हिवाळ्यात गाडी जास्त काम काढते? मग हे हॅक्स लक्षात ठेवा मायलेज ही राहिल टकाटक
- Published by:Devika Shinde
Last Updated:
थंड हवामानात कारचा परफॉर्मन्स आणि मायलेज दोन्ही कमी होऊ शकतात. पण जर तुम्ही काही लहानसहान तपासण्या आणि तयारी आधीच करून घेतली, तर संपूर्ण हिवाळा तुम्ही कारच्या इंजिनवर परिणाम न होता, चांगल्या मायलेजसह चालवू शकता. चला तर जाणून घेऊया हिवाळ्यात कारला बिनधास्त दामटण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स.
मुंबई : हिवाळा आला की आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. अनेक लोक आजारी पडतात. पण तुम्हाला माहितीय का की थंडीत याच पद्धतीचा त्रास हा गाड्यांना ही होतो. हो तुम्ही बरोबर वाचलंत. थंडीत अनेकदा गाड्याही त्रास देऊ लागतात. हे तुम्ही अनेक वेळा पाहिलं असेल.
थंड हवामानात कारचा परफॉर्मन्स आणि मायलेज दोन्ही कमी होऊ शकतात. पण जर तुम्ही काही लहानसहान तपासण्या आणि तयारी आधीच करून घेतली, तर संपूर्ण हिवाळा तुम्ही कारच्या इंजिनवर परिणाम न होता, चांगल्या मायलेजसह चालवू शकता. चला तर जाणून घेऊया हिवाळ्यात कारला बिनधास्त दामटण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स.
1. इंजिन ऑइल आणि फिल्टर तपासा
हिवाळ्यात थंड तापमानामुळे इंजिन ऑइल घट्ट होतं, ज्यामुळे इंजिनवर ताण येतो. त्यामुळे योग्य ग्रेडचं इंजिन ऑइल वापरा आणि गरज असेल तर बदलून घ्या. त्यासोबतच ऑइल फिल्टर साफ करून घ्या, जेणेकरून इंजिनला योग्य लुब्रिकेशन मिळेल आणि मायलेज टिकून राहील.
advertisement
2. बॅटरी चेकअप
थंड हवामानात बॅटरीवर जास्त ताण पडतो कारण चार्ज पटकन संपतो. त्यामुळे बॅटरीची स्थिती तपासा आणि ती जुनी असल्यास बदलण्याचा विचार करा. त्याचबरोबर बॅटरी टर्मिनल्स स्वच्छ ठेवणंही खूप महत्वाचं आहे, जेणेकरून कनेक्शन व्यवस्थित राहील.
3. टायर प्रेशर आणि ग्रिप तपासा
हिवाळ्यात टायरचा प्रेशर कमी होतो, ज्यामुळे मायलेजवर थेट परिणाम होतो. म्हणून हिवाळा सुरू होण्यापूर्वी टायर प्रेशर योग्य करून घ्या. तसेच टायरची ग्रिप तपासा. जर टायर घासलेले असतील, तर नवे टायर लावून घ्या, जेणेकरून रस्त्यावर गाडीची पकड चांगली राहील.
advertisement
4. कूलंट तपासा
हिवाळ्यात इंजिन थंडीपासून वाचवण्यासाठी कूलंटची मोठी भूमिका असते. कूलंटची पातळी योग्य आहे का ते तपासा आणि त्यात एंटीफ्रीझ योग्य प्रमाणात आहे का याची खात्री करा. यामुळे इंजिन ओव्हरहिटिंगपासून आणि थंड हवामानाच्या परिणामापासून सुरक्षित राहतं.
5. ब्रेक सिस्टम तपासा
हिवाळ्यात रस्ते घसरडे होऊ शकतात. त्यामुळे ब्रेक्स व्यवस्थित काम करणं खूप गरजेचं आहे. ब्रेक पॅड्स, ब्रेक फ्लुइड आणि ब्रेक डिस्क तपासा आणि गरज असल्यास बदलून घ्या. यामुळे तुमची सुरक्षा कायम राहील आणि गाडीचा परफॉर्मन्सही उत्तम राहील.
advertisement
हिवाळ्यात फक्त उबदार कपड्यांचीच नाही तर गाडीची देखील योग्य काळजी घ्यायला हवी. वरील टिप्स फॉलो केल्या तर तुमची कार पूर्ण हिवाळाभर तगडी परफॉर्मन्स आणि छान मायलेज देईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 27, 2025 9:40 PM IST