SUV Car: छोटी कार किती दिवस चालवणार? दिवाळीला घरी आणा टँकसारखी मजबूत SUV, किंमतही कमी!
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
भारतीय बाजारपेठेत टाटा मोटर्सने दोन लोकप्रिय कॉम्पॅक्ट एसयूव्ही- टाटा नेक्सॉन आणि टाटा पंच या गाड्या ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय ठरत आहेत. दोन्ही गाड्या स्टायलिश डिझाइन, मजबूत बांधणी आणि उत्कृष्ट सेफ्टी फीचर्ससाठी ओळखल्या जातात.
मुंबई: दिवाळीचा सण म्हणजे शुभ मुहूर्त, नवीन सुरुवातींचा काळ आणि घरगुती खरेदीसोबतच नवीन गाड्यांची मागणीही याच काळात वाढते. भारतीय बाजारपेठेत सध्या एसयूव्ही सेगमेंटमध्ये टाटा मोटर्सने आपले मजबूत स्थान निर्माण केले आहे. कंपनीच्या दोन लोकप्रिय कॉम्पॅक्ट एसयूव्ही- टाटा नेक्सॉन आणि टाटा पंच या गाड्या ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय ठरत आहेत. दोन्ही गाड्या स्टायलिश डिझाइन, मजबूत बांधणी आणि उत्कृष्ट सेफ्टी फीचर्ससाठी ओळखल्या जातात. खास म्हणजे, दोन्ही मॉडेल्सना ग्लोबल NCAP कडून 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. तर या गाड्यांचे फिचर्स आणि त्यांची किंमत आपण जाणून घेऊ.
टाटा नेक्सॉन किंमत आणि फीचर्स: टाटा नेक्सॉन ची एक्स‑शोरूम किंमत सुमारे ₹ 8.00 लाख पासून सुरू होऊन उच्च व्हेरिएंटसाठी ₹ 15.60 लाखपर्यंत जाते. या SUV मध्ये 1,199 cc टर्बो पेट्रोल इंजिन, डिझेल आणि CNG पर्याय उपलब्ध आहेत. नेक्सॉनमध्ये 6 एअरबॅग्ज, LED हेडलॅम्प्स, 10.25 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, Android Auto/Apple CarPlay सपोर्ट, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 360° कॅमेरा, ESP (Electronic Stability Program) आणि विविध ड्रायव्हिंग मोड्स (Eco, City, Sport) सारखी आधुनिक सुविधा आहेत. उच्च व्हेरिएंटमध्ये व्हेंटिलेटेड सीट्स, क्रूझ कंट्रोल आणि कनेक्टेड कार तंत्रज्ञान देखील आहेत. हे SUV हायवे ड्रायव्हिंगसाठी आणि गतिमान अनुभवासाठी योग्य आहे.
advertisement
टाटा पंच किंमत आणि फीचर्स: टाटा पंच कॉम्पॅक्ट आकारात असून, एक्स‑शोरूम किंमत सुमारे ₹ 6.19 लाख पासून सुरू होऊन ₹ 10.32 लाखपर्यंत जाते. पंचमध्ये 1,199 cc पेट्रोल इंजिन मानक आहे आणि काही व्हेरिएंटमध्ये CNG पर्याय उपलब्ध आहे. हे SUV शहरी वापरासाठी आदर्श आहे आणि 5-सीटर केबिनसह आरामदायी प्रवासाची खात्री देते. पंचमध्ये 5-स्टार GNCAP सेफ्टी रेटिंग, ड्युअल एअरबॅग्ज, ESP, ISOFIX mounts, 90° दरवाजे, फ्लॅट फ्लोर, इलेक्ट्रिक ORVMs आणि उच्च व्हेरिएंटमध्ये क्रूझ कंट्रोल उपलब्ध आहे.
advertisement
दोन्ही SUV ची तुलना करता, नेक्सॉन अधिक प्रीमियम फीचर्स, मोठा इंजिन पर्याय आणि गतिमान अनुभव देऊ शकतो, त्यामुळे हायवे आणि लांब प्रवासासाठी उत्तम आहे. पंच मात्र कॉम्पॅक्ट आकारात असून शहरी ड्रायव्हिंगसाठी सोपा, कमी किंमतीत उपयुक्त आणि आवश्यक सुविधा पुरवणारा आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 17, 2025 5:00 PM IST
मराठी बातम्या/ऑटो/
SUV Car: छोटी कार किती दिवस चालवणार? दिवाळीला घरी आणा टँकसारखी मजबूत SUV, किंमतही कमी!