Fancy Number Plate: HR88B8888-देशातील सर्वात महागडा फॅन्सी नंबर, तोडले सर्व विक्रम; 'VIP नंबर' साठी मोजले तब्बल इतके कोटी

Last Updated:

Fancy Number Plate: हरियाणाच्या ऑनलाइन लिलावात HR88B8888 या फॅन्सी नंबर प्लेटने विक्रमी 1.17 कोटींची किंमत मिळवत देशातील सर्वात महागडा वाहन क्रमांक ठरला. ‘8’ अंकाच्या शुभ मानल्या जाणाऱ्या जादूमुळे या नंबरसाठी तब्बल 45 जणांनी बोलीची झुंबड उडवली.

News18
News18
चंदिगढ: भारतात आकर्षक आणि फॅन्सी नंबर प्लेट्सबद्दलची क्रेझ नेहमीच मोठी राहिली आहे. कारप्रेमी लोक आपल्या वाहनासाठी हवा असलेला ‘VIP नंबर’ मिळवण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाहीत. मात्र या वेडाला आता आणखी उंची मिळाली आहे. हरियाणामध्ये नुकताच एका फॅन्सी नंबर प्लेटने देशातील सर्वात महागड्या वाहन क्रमांकाचा नवा विक्रम केला आहे.
advertisement
बुधवार 26 नोव्हेंबर रोजी हरियाणातील एका खास नंबर प्लेटने लिलावात तब्बल 1.17 कोटींची किंमत मिळवली. हा नंबर आहे HR88B8888 जो आता भारतात कधीही विकला गेलेला सर्वात महागडा वाहन नोंदणी क्रमांक ठरला आहे.
advertisement
लिलाव जिंकणाऱ्या व्यक्तीची ओळख अधिकृतरीत्या उघड करण्यात आलेली नाही.  सूत्रांनुसार विजेता हिसारचा रहिवासी सुधीर असू शकतो असे कळते. 
या नंबरची लोकप्रियता आणि आकर्षण त्याच्या दृश्य स्वरूपात दडलेले आहे. मोठ्या अक्षरातीलB’ हे अंक8’ शी अगदी मिळतेजुळते दिसते, त्यामुळे HR88B8888 हा क्रमांक एक लांब888888’ सारखा दिसतो. अनेक संस्कृतींमध्ये8’ हा अंक शुभ मानला जातो; हीच गोष्ट नंबरला अधिक खास आणि महाग बनवणारी ठरली.
advertisement
नंबरची रचना अशी आहे:
HR : हरियाणाचा स्टेट कोड
88 : प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) कोड
B : वाहन सीरिज कोड
8888 : चार अंकी खास नोंदणी क्रमांक
हरियाणा सरकार दर आठवड्याला VIP किंवा फॅन्सी नंबर प्लेट्ससाठी ऑनलाइन लिलाव आयोजित करते. इच्छुक बोलीदार शुक्रवार संध्याकाळी 5 वाजल्यापासून सोमवार सकाळी 9 वाजेपर्यंत अर्ज करू शकतात. त्यानंतर लिलाव प्रक्रिया सुरू होते आणि बुधवारी संध्याकाळी 5 वाजता निकाल जाहीर होतात. संपूर्ण प्रक्रिया अधिकृत पोर्टल fancy.parivahan.gov.in वरून ऑनलाइन पार पडते. लिलावात सहभागी होण्यासाठी व्यक्तीला 11,000 भरावे लागतात ( 1000 नोंदणी शुल्क आणि 10,000 सुरक्षा ठेव).
advertisement
HR88B8888 या नंबर प्लेटची सुरुवातीची बोली फक्त 50,000 होती. परंतु 45 अर्जदारांनी त्यासाठी स्पर्धा केल्याने किंमत झपाट्याने वाढली. दुपारपर्यंत बोली 88 लाखांपर्यंत पोहोचली आणि दिवसाच्या अखेरीस हा क्रमांक तब्बल 1.17 कोटींना विकला गेला.
यापूर्वीच्या लिलावात गेल्या आठवड्यात हरियाणामध्ये HR22W2222 या नंबरला 37.91 लाखांची बोली मिळाली होती. तर याच वर्षी एप्रिलमध्ये केरळमधील IT क्षेत्रातील अब्जाधीश वेनू गोपालकृष्णन यांनी KL 07 DG 0007 हा VIP नंबर 45.99 लाखांना खरेदी केला होता.
advertisement
view comments
मराठी बातम्या/ऑटो/
Fancy Number Plate: HR88B8888-देशातील सर्वात महागडा फॅन्सी नंबर, तोडले सर्व विक्रम; 'VIP नंबर' साठी मोजले तब्बल इतके कोटी
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement