Rat in Car: तुमच्या कारमध्येही उंदरांनी घर केलंय का? या सोप्या टिप्सने गाडीत फिरकणार नाही उंदीर

Last Updated:

तुमच्या कारमध्येही उंदरांनी थैमान घातलं आहे तर तुमचा प्रॉब्लम दूर करणारी ही माहिती आहे. या टिप्स फॉलो केल्यास तुमच्या कारमध्ये एकही उंदीर फिरकणार नाही. यामुळे तुम्हाला उंदीर मारण्याचीही गरज पडणार नाही. ते स्वतःच दूर राहतील.

कारमधून उंदीर कसे पळवायचे? जाणून घ्या टिप्स
कारमधून उंदीर कसे पळवायचे? जाणून घ्या टिप्स
मुंबई : आजच्या काळात अनेकांच्या घरात कार आहेत. मात्र अनेकदा कारमध्ये उंदीर होऊ लागतात. कारमधील कोपऱ्यांत उंदीर हे आपलं घर बनवतात. आपल्या घरात उंदीर सापडणं ही खूप सामान्य गोष्ट आहे. पण गाडीत उंदीर झाले तर ते गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान करु शकतात. आज आपण जाणून घेणार आहोत की, कोणत्या चुकांमुळे गाडीमध्ये उंदीर होतात. तसंच कारमधील उंदीर काढण्याच्या सोप्या ट्रिकही आपण जाणून घेणार आहोत.
या चुकांमुळे कारमध्ये शिरतात उंदीर
तुमच्या कारमध्ये खाण्या-पिण्याच्या वस्तू ठेवणं टाळा. कारमध्ये काही खाण्या-पिण्याच्या वस्तू खाली सांडल्या तर लगेच स्वच्छ करा. कारण उंदरांना खाद्यपदार्थांचा वास हा दूरुनच कळतो. ज्यामुळे ते कारमध्ये शिरतात.
अंधारात कार उभी करणं टाळा. खरंतर पावसाळ्यामध्ये हा प्रॉब्लम जास्त होतो. कारण या काळात उंदरांच्या बिळात पाणी भरतं. ज्यामुळे ते लपण्यासाठी अंधार असलेल्या जागांवर म्हणजेच कारमध्ये घुसून बसतात. अशावेळी पार्किंगच्या जागेवर एक छोटा बल्ब लावून ठेवा. यामुळे कारमध्ये उंदीर घुसण्याची शक्यता कमी होते.
advertisement
असा करा बचाव
-उंदरांना कारमधून दूर करण्यासाठी एक सोपा आणि घरगुती पद्धत म्हणजे, तुम्ही कारमध्ये नेफ्थलीन बॉल्सचा वापर करा. तुम्ही हे कारच्या बूट स्पेसमध्ये टाकू शकता.
-यासोबतच तुम्ही कारच्या इंजिनमध्ये अनडायल्यूटेड फिनाइलही शिंपडू शकता. यामुळे उंदरांपासून सुटका मिळण्यास मदत मिळते.
advertisement
-टोबॅकोने व्यक्तीला कँसर होतो. मात्र याच्या पानांनी कारमधून उंदीर निघण्यात मदत होते. अशावेळी तंबाकूच्या पानांचा पूर्ण गुच्छा कारच्या इंजिनजवळ ठेवू शकता. हे तुम्ही कारच्या डिग्गीमध्येही ठेवू शकता. याच्या वासामुळे उंदीर कारमध्ये घुसत नाहीत.
-रॅट रिपलेंट स्प्रे तुम्हाला ऑनलाइन सहज मिळेल. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवर हे तुम्हाला खूप कमी किंमतीत मिळेल. रॅट रिपलेंट स्प्रे कारमध्ये शिंपल्याने कारमध्ये उंदीर घुसणार नाहीत. तसंच कारच्या आजुबाजूलाही फिरकणार नाहीत. लक्षात ठेवात की, या स्प्रेचा वापर करताना लहान मुलं आणि वयस्करांना यापासून दूर ठेवा. अन्यथा हे धोकादायक ठरु शकतं.
advertisement
-Rat Repellent मशीन तुम्हाला ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर सहज मिळेल. ही एक अशी मशीन आहे. जी तुम्ही कारच्या इंजीनजवळ ठेवली तर एक अल्ट्रासोनिक साउंड निघतो. हा साउंड उंदरांना सहन होत नाही. ज्यामधून ते कारमधून निघून पळून जातात.
advertisement
या टिप्स फॉलो केल्याने तुमच्या कारमधून उंदीर पळून जाऊ शकतात. तुम्ही तुमच्या कारी चुका टाळल्या तर उंदीर तुमच्या कारमध्ये घुसणार नाहीत. यामुळे नंतर तुम्हाला कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही.
मराठी बातम्या/ऑटो/
Rat in Car: तुमच्या कारमध्येही उंदरांनी घर केलंय का? या सोप्या टिप्सने गाडीत फिरकणार नाही उंदीर
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement