35 किमी मायलेज, किंमतही 7 लाखांपासून, लाँचच्या तयारीत आहे 3 दणकट SUV!

Last Updated:

या एसयूव्हीमध्ये हायब्रिड इंजिन, ADAS, 360-डिग्री कॅमेरा आणि 35 Km पर्यंतचा मायलेज देतील, असा दावा कंपन्यांनी केला आहे.  

News18
News18
Maruti Brezza Facelift, Maruti Fronx Hybrid आणि New Gen Tata Nexon या एसयूव्हीचे नवी मॉडेल लाँच करण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे, या एसयूव्हीमध्ये हायब्रिड इंजिन, ADAS, 360-डिग्री कॅमेरा आणि 35 Km पर्यंतचा मायलेज देतील, असा दावा कंपन्यांनी केला आहे.
Maruti Suzuki Brezza Facelift - सर्वात आधी येतेय ती मारुती सुझुकीची Maruti Suzuki Brezza Facelift. मारुतीने ब्रेझा ही २०२२ मध्ये लाँच केली होती. त्यानंतर आता नवीन अपडेटसह घेऊन येत आले आहे. याच डिसेंबर महिन्यात Maruti Suzuki Brezza Facelift लाँच होणार आहे. नव्या Maruti Suzuki Brezza Facelift मध्ये नवीन LED लाइटिंग, रिफ्रेश्ड ग्रिल आणि जास्त प्रीमियम इंटीरियर असणार आहे. नव्या ब्रेझामध्ये 1.5-लीटर K-Series पेट्रोल इंजिन असेल, जे 105 PS ची पॉवर आणि अंदाजे 20–22 kmpl इतका मायलेज देईल. फिचर्समध्ये, मोठा टचस्क्रीन, वायरलेस चार्जिंग, 360 कॅमेरा, 6 एअरबॅग्ज आणि ESP सारखे सेफ्टी फीचर्स असणार आहे. या एसयूव्हीची किंमत अंदाजे  8.5 लाख रुपये असण्याची शक्यता आहे.
advertisement
Maruti Fronx Hybrid - दुसऱ्या क्रमांकावरही मारुती सुझुकीची Maruti Fronx Hybrid येतेय. मागील अनेक वर्षांपासून Maruti Fronx Hybrid ची चर्चा सुरू आहे. पण ही मिड साईज एसयूव्ही
2026 च्या सुरुवातीला लाँच होण्याची चिन्ह आहे. Maruti Fronx Hybrid मध्ये 1.2-लीटर Z12E पेट्रोल इंजिन असेल आणि मारुतीचं स्वत: चं हायब्रिड टेक्नॉलॉजी बेस सिस्टिम असणार आहे. त्यामुळेMaruti Fronx Hybrid ही 35 kmpl पेक्षा जास्त मायलेज देईल, असा दावा कंपनीने केला आहे.
advertisement
एवढंच नाहीतर Maruti Fronx Hybrid च्या डिझाइनमध्येही बदल केले जाणार आहे. Maruti Fronx Hybrid ला आता नवीन ग्रिल, LED हेडलॅम्प्स आणि सनरूफचा समावेश असणार आहे. लेव्हल-1 ADAS सारखे ॲडव्हान्स फिचर्स-जसे की ॲडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल आणि लेन कीप असिस्ट हे सुद्धा एसयूव्हीमध्ये असणार आहे. विशेष म्हणजे, Maruti Fronx Hybrid ची किंमत ही  7.5 ते 13 लाखदरम्यान असणार आहे. त्यामुळे ही गाडी मार्केटमध्ये गेमचेंजर ठरणार आहे.
advertisement
New Gen Tata Nexon - मजबूत आणि दणकट अशी ओळख असलेल्या टाटा मोटर्सच्या नेक्सॉनची New Gen Tata Nexon लाँच होणार आहे. टाटाने या गाडीला ‘Garud’ असं कोडनेम दिलं आहे. New Gen Tata Nexon ही   2026 च्या जानेवारी महिन्यात  अखेरीस लाँच होण्याची शक्यता आहे.  New Gen Tata Nexon च्या डिझाईनमध्ये बदल केले आहे, तिचं नवीन रूप हे  Curvv EV वरून घेण्यात आलं आहे. यामध्ये अनेक प्रीमियम फिचर्स असणार आहे.
advertisement
नवीन New Gen Tata Nexon मध्ये ट्विन 12.3-इंच स्क्रीन, हँड्स-फ्री बूट आणि स्मार्ट डोअर हँडल्स असणार आहे.  एवढंच नाहीतर ADAS आणि 6 एअरबॅग्ज असणार आहे. तसंच New Gen Tata Nexon चं EV व्हर्जन सुद्धा येईल. New Gen Tata Nexon EV मध्ये 45 आणि 55 kWh बॅटरी पॅक दिला जाण्याची चिन्ह आहे. त्यामुळे या EV व्हेरियंटची रेंज 489 ते 585 किमी इतका असण्याचा अंदाज आहे.  तर ICE मॉडेलमध्ये 1.2 लिटर टर्बो पेट्रोल आणि 1.5 लिटर डिझेल इंजिन दिलं जाणार आहे. New Gen Tata Nexon ची किंमत ही अंदाजे 8 लाखांपासून सुरू होईल.
view comments
मराठी बातम्या/ऑटो/
35 किमी मायलेज, किंमतही 7 लाखांपासून, लाँचच्या तयारीत आहे 3 दणकट SUV!
Next Article
advertisement
Gold Price Prediction: सोन्याच्या बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ चीच पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवणारा अंदाज
सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण
  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

View All
advertisement