Car ची टाकी एकदाच केली फुल, तब्बल 2831 किमी केला प्रवास, मग मायलेज किती? अख्खं जग झालं हैराण

Last Updated:

या ड्रायव्हरने डिझेल कार चालवून इतका जास्त मायलेज आणून दाखवला जे ऐकून अख्खं जग हैराण झालंय. या पठ्याने कारची टाकी फुल केली आणि तब्बल 2831 किमी चालवली.

News18
News18
एखादी कार तुम्ही विकत घ्यायला गेला तर सर्वात आधी सगळेच विचारतात मायलेज किती देते? साहजिकच हा प्रश्न कुणीही विचारू शकतो. पण, एका ड्रायव्हरने असा पराक्रम केला आहे जे ऐकून कुणालाही विश्वास बसणार नाही. मुळात पेट्रोलपेक्षा सगळीकडे डिझेल गाड्या विकत घेतात,कारण त्या डिझेल स्वस्त आणि मायलेजही जास्त मिळतं. पण, या ड्रायव्हरने डिझेल कार चालवून इतका जास्त मायलेज आणून दाखवला जे ऐकून अख्खं जग हैराण झालंय. या पठ्याने कारची टाकी फुल केली आणि तब्बल 2831 किमी चालवली. त्याचा हा पराक्रम गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवला आहे.
पोलिश रॅली ड्राइव्हर मिको मार्जिक असं या पठ्याचं नाव आहे. मिको मार्जिक हा 2025 युरोपीय रॅली चॅम्पियनशिपचा विजेता आहे. त्याने हा पराक्रम आपल्या स्कोडा सुपर्ब (Skoda Superb) कारद्वारे केला आहे. मिको मार्जिकने  Skoda Superb ची टाकी फुल केली. ही Skoda Superb एक डिझेल कार आहे. त्याने कारची टाकी फुल केली आणि सलग चालवली. एकदा फुल केलेल्या टाकीने तब्बल 2,831 किमी अंतर त्याने पार केलं. जगात ही दुसरी कार आहे, ज्याने हा भीम पराक्रम केला आहे. मिकोचा हा पराक्रम आता  गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवला आहे. मिकोनं एकदाचा कारची डिझेल टाकी फुल करून सर्वात दूर अंतर पार केलं. आता तुम्ही विचार करत असाल तर त्याने कारमध्ये काही बदल केला असेल पण त्याने असं काहीच केलं नाही. त्याचा हा पराक्रम पाहून सगळेच हैराण झाले आहे.
advertisement
 20,000 किमीआधीच रनिंग होतं कारचं!
विशेष म्हणजे, मिकोनं हा पराक्रम करण्यासाठी Skoda Superb कारची निवड केली. या कारचं रनिंग आधीच  20,000 किलोमीटर झालं होतं. या प्रवासासाठी मिकोनं कारमध्ये काहीच बदल केला नाही. कार जशी होती तशीच वापरली. या कारमध्ये स्टॉकमध्ये 66L फ्यूल टँक सुद्धा ठेवला होता. फक्त कारमध्ये 16-इंचाचे अलॉय  व्हिलवर लो-रेसिस्टेंस टायर आणि स्पोर्टलाइन व्हेरिएंटमध्ये सस्पेंशन स्प्रिंग्स वापरले ज्यामुळे ग्राउंड क्लिअरेंस 15 मिमी कमी झालं.
advertisement
कुठून कुठे केला प्रवास?
मिकोनं  पोलँड ते जर्मनी आणि फ्रांस असा प्रवास केला. पुढे नेदरलँड, बेल्जियम आणि जर्मनी असा प्रवास केला. या प्रवासात बाहेर वातावरण हे थंड होतं. कधी कधी तर तापमान हे उणे 1 डिग्री सेल्सियस पर्यंत गाठत होतं. मिकोनं या प्रवास Skoda Superb मध्ये  66L फ्यूल टँक फुल केला होता, यामध्ये साधचं डिझेल वापरलं होतं. यात कोणतंही प्रीमियम डिझेल वापरलं नाही.  66 लिटर टँकमध्ये Skoda Superb ने  2,831 किमी अंतर पार केलं. या अंतरामध्ये Skoda Superb ने 42.89 किमी/लिटर मायलेज  दिलं.
advertisement
80 किमी स्पीड
मिकोनं संपूर्ण प्रवासात कार ही  80 किमी प्रति कास वेगाने चालवली. यापेक्षा त्याने स्पीड लिमिट क्रॉस केली नाही. Skoda Superb कारची टाकी ही पूर्ण क्षमतेनं भरली तर आणखी जास्त मायलेज देऊ शकते. मी नियमित मिळणारं डिझेल वापरलं होतं. जर प्रीमियम डिझेल वापरलं तर फुट टाकीमध्ये 3,000 किमी प्रवास करू शकतो, असा दावा मिकोनं केला आहे.
view comments
मराठी बातम्या/ऑटो/
Car ची टाकी एकदाच केली फुल, तब्बल 2831 किमी केला प्रवास, मग मायलेज किती? अख्खं जग झालं हैराण
Next Article
advertisement
Shiv Sena Shinde Alliance With MIM: परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम...''
परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम
  • बीडच्या परळी मध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण निर्माण झाले आहे.

  • एमआयएम सोबत अजित पवार गट आणि शिंदे गटाने युती केली आहे.

  • यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

View All
advertisement