BH नंबर प्लेट असणाऱ्यांसाठी मोठी बातमी! रोज भरावा लागणार 100 रुपये दंड
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
बीए सीरिज नंबर प्लेटच्या गाड्यांसाठी रोड टॅक्स वेळेत न भरल्यास पुणे आरटीओने दररोज 100 रुपयांचा दंड आणि नोंदणीवर बंदीचा इशारा दिला आहे. ऑनलाईन सुविधा उपलब्ध.
हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. मात्र ज्यांच्याकडे या नंबरप्लेटच्या गाड्या आहेत त्यांना दर दोन वर्षांनंतर पैसे भरावे लागणार आहेत. ते न भरल्यास प्रत्येक दिवसाला दंड आकारण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तुमच्याकडे तर या नंबरप्लेटची गाडी नाही ना? तुमच्या घरात, मित्र मैत्रिणींकडे जर अशा नंबरप्लेटच्या गाड्या असतील तर त्यांच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे.
गाड्यांची संख्या वाढतेय मात्र रोड टॅक्स देण्याची वेळ आली की दुर्लक्ष केलं जात आहे. नियमांना कचऱ्याची टोपली दाखवणाऱ्यांवर आता रोज कारवाई केली जाणार आहे. त्यांना जोपर्यंत रोड टॅक्स भरत नाही तोपर्यंत प्रत्येक दिवसाचा दंड आकारला जाणार आहे. दोन वर्षांपूर्वी नवी कोरी गाडी घेऊन अभिमानाने घराजवळ उभी केलेली गाडी आता तुमच्याच निष्काळजीपणामुळे आर्थिक डोकेदुखी ठरू शकते. बीए सीरिज असलेल्या नंबर प्लेटसाठी रोड टॅक्स वेळेत न भरल्यास दररोज 100 रुपयांचा दंड आणि विलंबानुसार अतिरिक्त रक्कम आकारण्याचा इशारा पुणे आरटीओ विभागाने दिला आहे.
advertisement
2019 मध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जाहीर केलेल्या नियमांनुसार, बीए मालिकेतील क्रमांक असलेल्या वाहनधारकांनी गाडी खरेदी केल्यानंतर दोन वर्षांनी कर भरणं बंधनकारक आहे. मात्र, अनेक वाहनधारक मुदत संपूनही कर भरत नसल्याचं स्पष्ट झालं आहे. पुण्यात अशा वाहनांची संख्या हजारोंमध्ये असल्याचा अंदाज आहे. कराची मुदत संपल्यानंतर सात दिवसांच्या अवधीनंतर दररोज 100 रुपयांचा दंड लागू होतो.
advertisement
वाहनधारकांनी अजूनही कर भरण्याकडे दुर्लक्ष केल्यास न्यायालयीन प्रक्रिया सुरू करण्याचा प्रस्तावही आरटीओकडून तयार करण्यात येतो. यामुळे वाहनांच्या नोंदणीवर बंदी येण्याची शक्यता आहे. कर भरण्यासाठी परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहे. तसेच नजीकच्या आरटीओ कार्यालयातूनही कर भरण्याची सोय करण्यात आली आहे. तरीही हजारो वाहनधारकांकडून कर प्रलंबित असल्याचं आरटीओचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भारते यांनी सांगितलं.
advertisement
गाडी खरेदी करताना हप्ते आणि इन्शुरन्स वेळेवर भरणारे वाहनधारक कर मात्र टाळताहेत. पण हा कर वेळेत न भरल्यास दंडाचा आकडा झपाट्याने वाढू शकतो आणि वाहनाची नोंदणीही धोक्यात येऊ शकते. त्यामुळे वाहनधारकांनी तातडीने कर भरावा, असं आवाहन परिवहन विभागाकडून करण्यात आलं आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 03, 2025 9:42 AM IST


