Tata च्या टँकसारख्या SUV ला टाटाच्या नव्या एसयूव्हीने पाडलं मागे, सगळेच शॉक!

Last Updated:

सेफ्टी रेटिंगमध्ये ५ स्टार ठरलेली नेक्सॉनला धक्का बसला आहे. टाटा मोटर्सच्या नव्या दमदार एसयूव्हीने नेक्सॉनला विक्रीमध्ये मागे टाकलं आहे. 

News18
News18
मुंबई : मागील काही वर्षांपासून मार्केटमध्ये मजबूत आणि दणकट अशा गाड्यांची खरेदी चांगलीच वाढली आहे. सेफ्टीमध्ये भारतीय कंपन्यांनी आपला दबदबा निर्माण केला आहे. टाटा मोटर्स आणि महिंद्राच्या कार आणि एसयूव्हींनी आपली वेगळी जागा बनवली आहे. अशातच सेफ्टी रेटिंगमध्ये ५ स्टार ठरलेली नेक्सॉनला धक्का बसला आहे. टाटा मोटर्सच्या नव्या दमदार एसयूव्हीने नेक्सॉनला विक्रीमध्ये मागे टाकलं आहे.
त्याचं झालं असं की, देशभरात जीएसटीच्या दरात कपात झाल्यानंतर कार आणि एसयूव्हीच्या खरेदीकडे लोकांचा कल वाढला आहे. त्यातच टाटा मोटर्सच्या नेक्सॉनने मागील ३ महिन्यात सर्वाधिक विक्रीचा मान पटकावला आहे. पण मागील महिन्यात टाटाच्या एका २५ लाख किंमतीच्या ईलेक्ट्रिक एसयूव्हीने नेक्सॉनला मागे टाकलं आहे.  नोव्हेंबर २०२५ मध्ये EV सेगमेंटमध्ये TATA Harrier.ev ची सर्वाधिक विक्री झाली आहे. TATA Harrier.ev मध्ये फिचर्स, परफॉर्मन्स आणि ऑफरोड फिचर्समुळे एसयूव्ही अल्पवधीत लोकप्रिय झाली आहे.
advertisement
नोव्हेंबर महिन्याच्या विक्रीमध्ये TATA Harrier.ev चे 2,458 यूनिट्स विकले गेले. तर तिथेच नेक्सॉन.EV चे फक्त  2,230 यूनिट्स विकले गेले. दोन्ही मॉडेलमध्ये खूप अंतर आहे. किंमत आणि फिचर्समध्ये बराच फरक आहे. पण, TATA Harrier.ev ने इथं बाजी मारली आहे.
TATA Harrier.ev इतकी वेगळी कशी? 
टाटा मोटर्सने TATA Harrier.ev चं जोरदार असं लाँचिंग केलं होतं. एवढंच नाहीतर TATA Harrier.ev मध्ये फोर बाय फोर व्हील ड्राईव्ह आणि बेस्ट फिचर्स आणि उत्तम अशी टेक्नॉलाजी अपडेट केली आहे. एवढंच नाहीतर कारची रेंजही 627 किमी पर्यंत आहे. या TATA Harrier.ev ची किंमत मुंबई ऑन रोड 22.66 लाख रुपये ते  31.46 लाखांमध्ये आहे. तर टॉप मॉडेलसह AWD चा पर्याय सुद्धा दिला आहे.
advertisement
 TATA Harrier.ev  मध्ये दमदार फिचर्स
TATA Harrier.ev मध्ये फिचर्सची कमी नाही. TATA Harrier.ev मध्ये 14.5-इंचाची  टचस्क्रीन सिस्टम (सॅमसंग NEO OLED स्क्रीन), 10-स्पीकर JBL ब्लॅक साउंड सिस्टम, 540-डिग्री कॅमेरा, डिजिटल IRVM, ऑटो पार्क, समन मोड आणि बरंच काही दिलं आहे. सोबतच पॉवरफुल एसयूव्हीपैकी एक AWD व्हर्जनमध्ये 75kWh बॅटरी पॅक आणि ड्युल मोटर सेटअप दिला आहे. त्यामुळे TATA Harrier.ev मध्ये तब्बल 309bhp आणि 504Nm इतका पीक टॉर्क जनरेट होतो.
view comments
मराठी बातम्या/ऑटो/
Tata च्या टँकसारख्या SUV ला टाटाच्या नव्या एसयूव्हीने पाडलं मागे, सगळेच शॉक!
Next Article
advertisement
Eknath Shinde : ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, एकनाथ शिंदेंनी बोलावली 'सिक्रेट' बैठक, कोणाला दिलं आमंत्रण?
ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, शिंदेंनी बोलावली 'सिक्रेट' बैठक, कोणाल
  • ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, एकनाथ शिंदेंनी बोलावली सिक्रेट बैठक, क

  • ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, एकनाथ शिंदेंनी बोलावली सिक्रेट बैठक, क

  • ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, एकनाथ शिंदेंनी बोलावली सिक्रेट बैठक, क

View All
advertisement