GST Cutनंतरची मोठी घोषणा,टाटाकडून फायदा थेट ग्राहकांच्या खिशात; गाड्यांच्या किमतींत अभूतपूर्व कपात

Last Updated:

Tata Commercial Vehicle Price Post GST Cut: टाटा मोटर्सने ग्राहकांना जबरदस्त दिवाळी भेट दिली आहे. 22 सप्टेंबरपासून SUV, कार, बस आणि ट्रक लाखोंनी स्वस्त होणार. GST कपातीचा पूर्ण फायदा टाटाकडून थेट ग्राहकांच्या खिशात टाकला आहे.

News18
News18
मुंबई: देशातील आघाडीची वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्सने (Tata Motors) एक मोठी घोषणा केली आहे. कंपनीने सांगितले आहे की, जीएसटीमध्ये झालेल्या कपातीचा पूर्ण लाभ ते त्यांच्या व्यावसायिक वाहन ग्राहकांना देतील. 22 सप्टेंबरपासून टाटाच्या सर्व ट्रक, बस आणि इतर व्यावसायिक वाहनांच्या किमती कमी होतील. जीएसटी 18% केल्यामुळे वाहतूक आणि लॉजिस्टिक्स क्षेत्राला बळकटी मिळेल आणि ट्रान्सपोर्टर, फ्लीट ऑपरेटर आणि लहान व्यावसायिकांचा खर्च कमी होईल, असे कंपनीने म्हटले आहे.
advertisement
व्यावसायिक वाहनांच्या किमतीत मोठी घट
अवजड ट्रक (HCV): 2.8 लाख ते 4.65 लाख रुपयांपर्यंत स्वस्त होतील.
हलके आणि मध्यम ट्रक: 1 लाख ते 3 लाख रुपयांपर्यंत स्वस्त होतील.
advertisement
बस आणि व्हॅन: 1.2 लाख ते 4.35 लाख रुपयांपर्यंत स्वस्त होतील.
छोट्या प्रवासी व्यावसायिक वाहने: 52,000 ते 66,000 रुपयांपर्यंत स्वस्त होतील.
advertisement
पिकअप ट्रक: 30,000 ते 1.1 लाख रुपयांपर्यंत स्वस्त होतील.
टाटाच्या प्रवासी गाड्याही स्वस्त होणार
यापूर्वी, कंपनीने आपल्या प्रवासी वाहनांच्या किमती कमी करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार, त्यांच्या प्रवासी कार आणि एसयूव्हीच्या किमतीत 65,000 रुपयांपासून ते 1.45 लाख रुपयांपर्यंत कपात केली जाईल. नवीन किमती 22 सप्टेंबर 2025 पासून लागू होतील.
advertisement
टियागो: 75,000 रुपयांनी स्वस्त.
टिगोर: 80,000 रुपयांनी स्वस्त.
अल्ट्रोज: 1.10 लाख रुपयांनी स्वस्त.
पंच: 85,000 रुपयांनी स्वस्त.
नेक्सॉन: 1.55 लाख रुपयांनी स्वस्त.
advertisement
कर्व: 65,000 रुपयांनी स्वस्त.
हॅरियर: 1.40 लाख रुपयांनी स्वस्त.
सफारी: 1.45 लाख रुपयांनी स्वस्त.
22 सप्टेंबरपासून नवीन जीएसटी प्रणाली
1200 सीसीपर्यंतच्या पेट्रोल/सीएनजी गाड्या आणि 1500 सीसीपर्यंतच्या डिझेल गाड्या (4 मीटरपर्यंत लांबी) यांच्यावर आता 18% जीएसटी लागणार आहे. तर 1200 सीसीपेक्षा जास्त इंजिन आणि 4 मीटरपेक्षा लांब गाड्यांवर 40% जीएसटी राहील. हे नवीन जीएसटी दर 22 सप्टेंबरपासून (नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून) लागू होतील.
advertisement
view comments
मराठी बातम्या/ऑटो/
GST Cutनंतरची मोठी घोषणा,टाटाकडून फायदा थेट ग्राहकांच्या खिशात; गाड्यांच्या किमतींत अभूतपूर्व कपात
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement