Bike ची चावी वाहतूक पोलिसांनी काढून घेतली, नियमांनुसार चूक की बरोबर? कायदा काय सांगतो?
- Published by:sachin Salve
Last Updated:
दुचाकी चालकांना सगळ्या जास्त जर भीती कुणाची वाटत असेल तर वाहतूक पोलिसांची. कारण, कुठल्याही मार्गावर वाहतूक पोलीस कधीही चौकशी करत असतात.
दुचाकी चालकांना सगळ्या जास्त जर भीती कुणाची वाटत असेल तर वाहतूक पोलिसांची. कारण, कुठल्याही मार्गावर वाहतूक पोलीस कधीही चौकशी करत असतात. तुमच्याकडे जर कागदपत्र आणि हेल्मेट असेल तर तुमची सुटका होते. पण ८० टक्के लोकांवर वाहतूक पोलीस हमखास कारवाई करतात. कारण, भारतात वाहतुकीचे नियम सर्रासपणे पायदळी तुडवले जातात. अशातच वाहतूक पोलिसांकडून जेव्हा तपासणी सुरू असते तेव्हा जर पोलीस जर तुमच्या बाइकची चावी काढून घेतात आणि नंतर दंड आकारतात. पण बाईकची चावी ही कायद्याने काढून घेणे खरंच योग्य आहे का?
advertisement
हा प्रश्न प्रत्येक दुचाकीस्वाराला पडलेला असतो. कारण, नाकाबंदीच्या वेळी वाहतूक पोलीस आधी दुचाकीची चावी काढून घेतात. पण मोटार वाहन कायद्याच्या नियमांनुसार, वाहतूक पोलिसांना दुचाकीच्या चाव्या काढून घेण्याचा अधिकार नाही. अशा परिस्थितीत तुम्ही वाहतूक पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार करू शकता. बाईकची चावी फक्त विशेष परिस्थितीतच काढता येते. जर बाईकची चावी काढून घेतली तर हे नक्की करा.
advertisement
शांत रहा : अशा वेळी तुम्ही शांत राहा आणि पोलिसांशी आदराने बोला. त्यांचं लक्षपूर्वक ऐका आणि त्यांच्या सूचनांचं पालन करा.
नेमकी चूक काय झाली ते जाणून घ्या: तुमच्या बाइकची चावी काढून घेतली आहे आणि तुम्ही कोणता नियम मोडला आहे हे पोलिसांना विचारा. तुम्ही कोणती चूक केली आहे हे समजण्यासाठी हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
advertisement
चुक असेल तर दंड भरा: जर तुम्ही वाहतुकीचा नियम मोडला असेल तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. वाहतूक पोलिसांकडून रितसर चलन घ्या आणि दंड भरून मोकळे व्हा. उगाच वाद घालत बसू नका. ज्यामुळे तुमच्या अडचणीत वाढ होऊ शकते.
जर आपली चूक नसेल तक्रार करा: जर तुम्हाला वाटत असेल की, वाहतूक पोलिसांनी तुमच्या बाइकची चावी ही मुद्दामहुन काढली. आपल्याकडे सगळी कागदपत्र आहे. नियमांचं पालन केलं आहे. आणि पोलिसांनी बाइकची चावी चुकीच्या पद्धतीने काढून घेतली आहे, तर तुम्ही संबंधित पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करू शकता किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकता.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 02, 2025 9:06 PM IST
मराठी बातम्या/ऑटो/
Bike ची चावी वाहतूक पोलिसांनी काढून घेतली, नियमांनुसार चूक की बरोबर? कायदा काय सांगतो?