Arbaaz -Sshura Baby: 58 व्या वर्षी दुसऱ्यांदा वडील बनला अरबाज खान, पत्नी शूराने गोंडस बाळाला दिला जन्म
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Arbaaz Khan-Sshura Khan: बॉलिवूडच्या सर्वात चर्चित खान कुटुंबात सध्या आनंदाचे वातावरण आहे. सलमान खानचा भाऊ अरबाज खान आणि त्याची पत्नी शूरा खान यांना नुकतीच गुडन्यूज दिली आहे.
मुंबई : बॉलिवूडच्या सर्वात चर्चित खान कुटुंबात सध्या आनंदाचे वातावरण आहे. सलमान खानचा भाऊ अरबाज खान आणि त्याची पत्नी शूरा खान यांना नुकतीच गुडन्यूज दिली आहे. दोघेही आई-बाबा झाले आहेत. या गोड बातमीने संपूर्ण खान परिवारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अरबाज खान आणि त्याची पत्नी शूरा खान कन्यारत्न प्राप्त झालं आहे. खान कुटुंबात छोट्या चिमुकलीचं आगमन झालं आहे. या गोड बातमीने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. अरबाज आणि शूरावर अभिनंदन आणि आशिर्वादांचा वर्षाव होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शूरा खानने 4 ऑक्टोबर रोजी मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये एका गोंडस मुलीला जन्म दिला. रुग्णालयात या काळात कडक सुरक्षा ठेवण्यात आली होती आणि फक्त जवळच्या कुटुंबीयांनाच आत प्रवेश दिला गेला. प्रसूतीच्या वेळी अरबाज खान स्वतः पत्नीच्या सोबत होता, आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद लपवता येत नव्हता.
advertisement
जरी खान कुटुंबाने अद्याप अधिकृतपणे या बातमीची पुष्टी केलेली नसली, तरी सोशल मीडियावर चाहत्यांनी शुभेच्छांचा पाऊस पाडायला सुरुवात केली आहे. इंस्टाग्राम आणि X (ट्विटर) वर #BabyKhan आणि #ArbaazShura हे हॅशटॅग ट्रेंडमध्ये आहेत.
advertisement
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अरबाज आणि शूराच्या बेबी शॉवरचे फोटो व्हायरल झाले होते. त्या फोटोंमध्ये सलमान खान, हेलन, अल्विरा आणि संपूर्ण खान कुटुंब उपस्थित होते. आता त्यांच्या घरी ‘लक्ष्मीचा’ म्हणजेच एका गोंडस मुलीचा आगमन झाल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 05, 2025 3:37 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Arbaaz -Sshura Baby: 58 व्या वर्षी दुसऱ्यांदा वडील बनला अरबाज खान, पत्नी शूराने गोंडस बाळाला दिला जन्म