स्कूटीचे चाक नेहमी बाईकपेक्षा लहान का असतात? कारण असं की जाणून म्हणाल याचा तर आम्ही विचार देखील केला नसेल
- Published by:Devika Shinde
Last Updated:
स्कूटीचे लहान चाक. पण कधी विचार केलात का, स्कूटीचे चाक नेहमी बाईकपेक्षा लहान का असतात? हे केवळ डिझाईनचं कारण नाही, तर त्यामागे एक खोल तांत्रिक कारण (Technical Reason) दडलं आहे.
मुंबई : शहरातील गर्दी, सिग्नल्स आणि ट्रॅफिकच्या गोंधळात तुम्ही बाईक आणि स्कूटी दोन्ही रस्त्यावर पाहिलं असेल, पण तुम्ही दोन्ही बाईक आणि स्कूटीमध्ये एक गोष्ट नोटीस केली आहे का की दोघांच्या चाकांमध्ये फरक आहे. स्कूटी चालवणं नेहमीच जरा सोपं, हलकं आणि फुर्तीदायक वाटतं. याचं एक मुख्य कारण म्हणजे स्कूटीचे लहान चाक. पण कधी विचार केलात का, स्कूटीचे चाक नेहमी बाईकपेक्षा लहान का असतात? हे केवळ डिझाईनचं कारण नाही, तर त्यामागे एक खोल तांत्रिक कारण (Technical Reason) दडलं आहे.
स्कूटीचे चाक लहान का ठेवले जातात?
जर तुम्ही बाईक आणि स्कूटी शेजारी उभ्या केल्या, तर पहिलीच गोष्ट लक्षात येईल. चाकांचा आकार. बाईकमध्ये मोbikeठे आणि जाड टायर असतात, तर स्कूटीमध्ये लहान. हे केवळ दिसायला वेगळं नाही, तर ही इंजिनिअरिंगची शहाणी निवड आहे. स्कूटी मुख्यतः शहरात चालवण्यासाठी डिझाईन केली जाते. म्हणजे ट्रॅफिक, छोट्या गल्ल्या आणि वारंवार थांबणं-चालू करणं. त्यामुळे स्कूटीचे चाक लहान ठेवल्याने ती हलकी, कंट्रोलमध्ये आणि फुर्तीदार राहते.
advertisement
लहान चाकांचे फायदे
जास्त स्पीड आणि सोपी हँडलिंग, हान चाकांमुळे स्कूटीचं वळण घेणं अगदी सोपं होतं. टर्निंग रेडियस कमी असल्याने ती संकटलेल्या रस्त्यावरही सहज वळते, म्हणूनच महिलांना आणि नवख्या रायडर्सना स्कूटी चालवणं सोपं वाटतं.
लहान चाकं हलकी असतात आणि तयार करायला खर्चिकही कमी. त्यामुळे स्कूटीचं एकूण वजन घटतं. यामुळे मायलेज वाढतं आणि इंजिनवरचा ताण कमी होतो.
advertisement
लहान चाकांमुळे स्कूटीच्या फ्रेमखाली इंजिन आणि ट्रान्समिशन कॉम्पॅक्टरीतीने बसवता येतात. त्यामुळे सीटखाली हेल्मेट, बॅग किंवा किराणा ठेवण्यासाठी जागा मिळते, जी बाईकमध्ये नसते.
भारतासाठी का उपयोगी आहे हे डिझाईन
लहान चाकं कमी रोलिंग रेजिस्टन्स निर्माण करतात. म्हणजे टायर फिरवण्यासाठी कमी ताकद लागते आणि फ्युएल कन्झम्प्शन कमी होतं. शिवाय स्कूटीमध्ये पुढचं आणि मागचं दोन्ही चाक एकाच आकाराचं असतं, त्यामुळे मेंटेनन्स सोपा आणि किफायतशीर ठरतो. भारतात वारंवार पंक्चर होणाऱ्या रस्त्यांसाठी हा फीचर अत्यंत उपयोगी आहे.
advertisement
मग मोठी चाकं कशासाठी चांगली?
view commentsबाईकची मोठी चाकं जास्त स्थिरता आणि ग्रिप देतात, विशेषतः उंच रस्त्यांवर. त्यामुळे लांब प्रवासासाठी बाईक योग्य ठरते, तर शहरी प्रवासासाठी स्कूटी सर्वोत्तम पर्याय ठरते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 09, 2025 4:37 PM IST
मराठी बातम्या/ऑटो/
स्कूटीचे चाक नेहमी बाईकपेक्षा लहान का असतात? कारण असं की जाणून म्हणाल याचा तर आम्ही विचार देखील केला नसेल


