इंटरनेटवरील Job Offers वर विश्वास ठेवायचा का? 'या' गोष्टी माहित करुन घ्या आणि सावध व्हा!

Last Updated:

सध्याच्या ऑनलाइन युगात बहुतांश गोष्टी या ऑनलाइनच चालतात. मग अशा परिस्थीतीत ऑनलाईन जॉब ऑफर्सवर भरोसा ठेवायचा की नाही असा प्रश्न अनेकांच्या मनात उद्भवतो.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : ऑनलाइन फसवणूकीचे अनेक प्रकार वाढत चालले आहेत. कोणी नोकरीच्या नावावर तर कोणी घराच्या नावावर, तर कोणी कस्टमर केअरच्या नावावर लोकांची फसवणूक करत आहे. नोकरीसाठी गरजू लोकांचा तर यामध्ये मोठा फायदा घेतला जातो आणि त्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होते.
सध्याच्या ऑनलाइन युगात बहुतांश गोष्टी या ऑनलाइनच चालतात. मग अशा परिस्थीतीत ऑनलाईन जॉब ऑफर्सवर भरोसा ठेवायचा की नाही असा प्रश्न अनेकांच्या मनात उद्भवतो. त्यामुळे सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
अनेक प्रकरणांमध्ये फसवणूक करणारे डिजिटल जाहिराती, ऑनलाइन मेसेंजर आणि बल्क एसएमएसद्वारे लोकांना टार्गेट करतात. यामध्ये लोकांना काही तास कामाच्या बदल्यात चांगली रक्कम देण्याचे आमिष दाखवले जाते. त्यांच्या कामात YouTube व्हिडीओंना लाइक करणे, काही लिंक शेअर करणे किंवा व्हिडीओंवर कमेंट करणे अशा प्रकारचे काम करण्यासाठी सांगितले जाते.
advertisement
लोकांना हे काम खूप सोपं आणि कामाचं वाटतं, ज्यामुळे अनेक लोक हे करण्याचा विचार करतात.
यासाठी तुम्हाला सुरुवातीला काही पैसे द्यावे लागतील. पण, एक-दोन दिवसांत त्यांच्या मागण्या वाढतात आणि लोकांची फसवणूक होते. अशा परिस्थितीत, आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला अशा घोटाळ्यांची सत्यता तपासू शकतात.
ऑनलाइन नोकरी खरी आहे की खोटी हे कसे ओळखावं?
advertisement
लाच देणाऱ्या ओळीमधून ओळखा
फसवणूकीची नोकरीची ऑफर देताना मेसेजमध्ये लाच देणारे शब्द वापरले जातात. एवढेच नाही तर घरबसल्या काम करून लाखो रुपये कमावता येतात, असं देखील म्हटलं जातं, जे अजिबात खरं नाही. त्यामुळे तुमच्यासाठी नोकरी कितीही महत्त्वाची असली तरी अशा घोटाळ्यांपासून दूर राहण्यातच शहाणपणा आहे.
या प्रकरणांमध्ये, तुमचं खरं काम आहे आहे किंवा तुमचं जॉब प्रोफाइल, तसेच रोल काय आहे? हे सांगितले जात नाही. याबाबत विचारणा केली असता, हे घोटाळेबाज प्रशिक्षण कालावधीत आम्ही ते सांगू असं खोटं सांगतात. कोणीही असं म्हटलं तर ती फ्रॉड नोकरी आहे समजून जा.
advertisement
पैसे देण्याची मागणी
अशा बनावट जॉब ऑफर तुम्हाला लिंक पाठवतात. त्यावर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला वैयक्तिक माहिती भरण्यास सांगितले जाईल. याव्यतिरिक्त, स्कॅमर पेमेंट करण्यासाठी तुमच्या बँक खात्याचे तपशील देखील विचारू शकतात. अशा फसवणुकीपासून सावध राहणे आवश्यक आहे.
त्यामुळे वरील प्रकारे तुम्हाला नोकरीची संधी आली तर सावध रहा आणि अशा लोकांना उत्तर देणं टाळा.
view comments
मराठी बातम्या/करिअर/
इंटरनेटवरील Job Offers वर विश्वास ठेवायचा का? 'या' गोष्टी माहित करुन घ्या आणि सावध व्हा!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement