Success Story : मायक्रोसॉफ्ट दीदीचा बोलबाला, मोठ्या पगाराची नोकरी सोडून सुरू केलं You tube चॅनल

Last Updated:

Success Story : तरुणीनं मायक्रोसॉफ्टमधील नोकरी सांभाळत आपलं यूट्युब चॅनेल सुरू केलं आहे. या चॅनेलच्या माध्यमातून ती देशाच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देते.

News18
News18
मुंबई, 21 ऑगस्ट : शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रत्येकाला नोकरी करण्याचे किंवा स्वत:चा व्यवसाय उभा करण्याचे वेध लागतात. जगभरातील जवळपास प्रत्येक तरुण-तरुणी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी धडपड करत असतो. त्यातली त्यात जर बक्कळ पगाराची नोकरी लागली तर मग आपला आनंद गगनात मावत नाही. मात्र, काही व्यक्ती अशा असतात ज्यांना अशा नोकरीत समाधान मिळत नाही. हरियाणातील श्रद्धा खापरा अशाच व्यक्तींपैकी एक आहे. 'मायक्रोसॉफ्ट दीदी' किंवा 'श्रद्धा दीदी' या नावानं ओळखल्या जाणार्‍या या तरुणीनं मायक्रोसॉफ्टमधील नोकरी सांभाळत आपलं यूट्युब चॅनेल सुरू केलं आहे. या चॅनेलच्या माध्यमातून ती देशाच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देते.
श्रद्धा खापरा ही हरियाणातील एका छोट्याशा खेड्यातील 23 वर्षांची तरुणी आहे. तिच्या परिसरामध्ये दर्जेदार शिक्षणाचा अभाव आहे. त्यामुळे तिला दिल्लीत येऊन उच्च शिक्षण पूर्ण करावं लागलं. अनेक अडचणींवर मात करून गावातली पहिली इंजिनीअर बनली. जैन भारती मृगावती विद्यालय येथे तिनं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं. इयत्ता दहावीच्या वर्गात तिनं 10 CGPA आणि इयत्ता 12वी मध्ये 94.4 टक्के गुण मिळवले. 2017 ते 2021 पर्यंत, श्रद्धानं नेताजी सुभाष इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये (NSIT) कॉम्प्युटर इंजिनीअरींगची पदवी घेतली. तिनं सरासरी 8.8 ग्रेड पॉइंट मिळवून ही पदवी मिळवली.
advertisement
श्रद्धाला मायक्रोसॉफ्टमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून तीन महिन्यांसाठी इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. मायक्रोसॉफ्टमधील कामाच्या ठिकाणी असलेल्या वातावरणाचा तिच्यावर महत्त्वपूर्ण प्रभाव पडला. असं वर्क कल्चर प्रत्येकानं अनुभवायला हवं, असं तिचं मत आहे. मायक्रोसॉफ्टनंतर, तिनं डीआरडीओमध्ये एक महिन्यासाठी संशोधन प्रशिक्षणार्थी म्हणून दुसरी इंटर्नशिप मिळवली. जुलै 2021 मध्ये, तिची तेलंगणातील मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून नियुक्ती झाली.
advertisement
मायक्रोसॉफ्टमध्ये चांगल्या पगाराची नोकरी सुरू असूनही श्रद्धा समाधानी नव्हती. काहीतरी बदल घडवून आणण्याच्या इच्छेनं तिला 'अपना कॉलेज' हे युट्यूब चॅनल सुरू करण्यास प्रवृत्त केलं. त्यावर तिनं शैक्षणिक कंटेंट शेअर करण्यास सुरुवात केली. अल्पावधीतच तिच्या चॅनेलला प्रचंड प्रतिसाद मिळाला. इन्स्टाग्रामवर तिचे 354K पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. तिला आता 'मायक्रोसॉफ्ट दीदी' अशी ओळख मिळाली आहे.
advertisement
श्रद्धा खापराचा प्रवास हा दृढनिश्चय, कठोर परिश्रम आणि आपल्या आवडींचा पाठपुरावा कसा करावा याचं उदाहरण आहे. तिची यशोगाथा अनेक महत्त्वाकांक्षी व्यक्तींना, विशेषत: ज्यांची पार्श्वभूमी फारशी चांगली नाही अशांना प्रेरणा देणारी आहे.
view comments
मराठी बातम्या/करिअर/
Success Story : मायक्रोसॉफ्ट दीदीचा बोलबाला, मोठ्या पगाराची नोकरी सोडून सुरू केलं You tube चॅनल
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement