कमाल! त्याने बनवली तीन चाकांची स्कूटर, सायकल नसेल येत तरी येणार चालवता

Last Updated:

इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कंपनीसाठी संशोधन करताना आपलं पहिलं प्रोडक्ट म्हणून त्याला या स्कूटरची कल्पना सुचली.

त्याचं इंजिनिअरिंगला प्रवेश घेण्यापूर्वीच ठरलं होतं की, आपण स्वतःची कंपनी सुरू करायची.
त्याचं इंजिनिअरिंगला प्रवेश घेण्यापूर्वीच ठरलं होतं की, आपण स्वतःची कंपनी सुरू करायची.
सच्चिदानंद, प्रतिनिधी
पाटणा, 17 ऑगस्ट : साधारणतः शिक्षण पूर्ण झाल्यावर आपण नोकरीच्या शोधात असतो. मात्र असे फार कमी विद्यार्थी असतात, जे इतर ठिकाणी नोकरी करत नाहीत, तर स्वतःची कंपनी सुरू करतात. काहीजण स्वतःचा व्यवसाय सुरू करतात. अभिमन्यूदेखील त्यापैकीच एक. त्याने इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतल्यानंतर स्वतःची कंपनी सुरू केली. 'वागा मोटर्स' असं त्याच्या कंपनीचं नाव. विशेष म्हणजे त्याने तीन चाकांची स्कूटर बनवली आहे, जिची परिसरात तुफान चर्चा आहे.
advertisement
बिहारच्या पाटणा जिल्ह्यात राहणाऱ्या अभिमन्यूचं इंजिनिअरिंगला प्रवेश घेण्यापूर्वीच ठरलं होतं की, आपण स्वतःची कंपनी सुरू करायची. इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कंपनीसाठी संशोधन करताना आपलं पहिलं प्रोडक्ट म्हणून त्याला या स्कूटरची कल्पना सुचली. कंपनी सुरू होताच त्याने या स्कूटरवर काम करायला सुरुवात केली. स्कूटर पहिल्याच प्रयत्नात बनून तयार झाली नाही, तर 2019 ते 2023 असे चार वर्ष त्याने यावर काम केलं. सहावेळा प्रयत्न केल्यानंतर सातव्यावेळी काढलेलं स्कूटरचं डिझाईन त्याला आवडलं. दरम्यान, अद्याप स्कूटरचं काही काम बाकी आहे. पूर्ण बदलानंतर ती मार्केटमध्ये लाँच केली जाईल.
advertisement
सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सायकल चालवता येत नसेल, तरी तुम्ही ही स्कूटर सहजरित्या चालवू शकता. तिच्यावर कोणीही बॅलन्स करू शकतं. 3 ते 4 तासांत ती पूर्णपणे चार्ज होते. एकदा चार्ज केल्यानंतर ती 30 किलोमीटर अंतरावर जाऊ शकते. तिचा जास्तीत जास्त 25 किलोमीटर प्रतितास वेग असेल. शिवाय या गाडीसाठी कोणत्याही प्रकारच्या लायसन्सची गरज भासणार नाही.
advertisement
अभिमन्यूने दिलेल्या माहितीनुसार, ही स्कूटर बनवण्यासाठी बिहार सरकार आणि आयआयटी पाटणाकडून निधी मिळाला. आता या स्कूटरच्या बॅटरीची क्षमता 50 किलोमीटर करण्यावर काम सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/देश/
कमाल! त्याने बनवली तीन चाकांची स्कूटर, सायकल नसेल येत तरी येणार चालवता
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement