लेकासाठी बापाने विकली जमीन, आता मुलाने राज्यभरात गाजवलं वडिलांचं नाव
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
परिस्थितीचं भान ठेऊन त्याने जीवापाड मेहनत केली. आज 22 वर्ष वयात तो नेमबाजीत राष्ट्रीय स्तरावर विविध पदकांची कमाई करत आहे.
मो. सरफराज आलम, प्रतिनिधी
सहरसा, 17 ऑगस्ट : मेहनत करणाऱ्यांच्या पदरात फळ पडतंच असं म्हणतात. याची अनेक उदाहरणं आपण आजूबाजूला पाहत असतो. अनेकजण तर लहानपणापासून एकच ध्येय उराशी बाळगून न थकता त्याची कास धरतात. विशेष म्हणजे ध्येय गाठल्यानंतर सुरुवात होते खऱ्या प्रवासाला, अर्थात त्यांच्या स्वप्नवत प्रवासाला. अशाच एका ध्येयप्रेमी तरुणाची यशोगाथा आज आपण जाणून घेणार आहोत. देवांश प्रिय असं त्याचं नाव.
advertisement
बिहारच्या देवांशला 14 वर्षांचा असल्यापासून नेमबाजीबाबत आकर्षण निर्माण झालं. त्याने नेमबाजीचे धडे घ्यायला सुरुवात केली. एकेकाळी जमीन विकून त्याला त्याच्या वडिलांनी रायफल घेऊन दिली होती. याच परिस्थितीचं भान ठेऊन देवांशने जीवापाड मेहनत केली. आज 22 वर्ष वयात तो नेमबाजीत राष्ट्रीय स्तरावर विविध पदकांची कमाई करत आहे. सहरसा जिल्ह्यातला रहिवासी असलेल्या देवांशने आपलं शिक्षण देहरादूनमध्ये पूर्ण केलं. आतापर्यंत त्याने राष्ट्रीय स्तरावरील नेमबाजीच्या विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे.
advertisement
अलीकडेच 7 ते 11 ऑगस्टदरम्यान सिवानमध्ये 33व्या बिहार राज्य शूटिंग चॅम्पियनशिपचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी देवांशने उत्कृष्ट कामगिरी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. यात त्याने सहरसा रायफल क्लबचं प्रतिनिधित्व केलं. 50 मीटर 3-पोजिशन स्पर्धेत त्याने सुवर्ण पदक पटकावलं, तर 50 मीटर प्रोन स्पर्धेत त्याने रौप्य पदकावर नाव कोरलं.
advertisement
देवांशच्या या यशाबद्दल त्याचे वडील बीएन सिंह यांनी अभिमान व्यक्त केला. ते म्हणाले, 'माझ्या मुलाने इथपर्यंत पोहोचण्यासाठी केलेल्या मेहनतीबाबत मला त्याचं कौतुक वाटतं. त्याच्याबद्दल मला अभिमान आहे.' एक वेळ अशीही होती जेव्हा देवांशला रायफलची आवश्यकता होती आणि ती खरेदी करण्यासाठी त्याच्या वडिलांकडे पैसे नव्हते. त्यावेळी त्यांनी त्यांची शहरी भागातली जमीन विकून देवांशला रायफलसाठी पैसे दिले होते.
advertisement
दरम्यान, देवांश सध्या काही खासगी कामानिमित्त दिल्लीत आहे. तो परतताच रायफल क्लब असोसिएशनच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात येणार असल्याचं कळतं आहे.
view commentsLocation :
Saharsa,Bihar
First Published :
August 17, 2023 11:29 AM IST


