Government Job : परराष्ट्र मंत्रालयात परीक्षा न देता मिळणार नोकरी, महिन्याला 70 हजार रुपये पगार, फक्त करावं लागेल हे काम

Last Updated:

परराष्ट्र मंत्रालयात नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्ण संधी चालून आली आहे.

परराष्ट्र मंत्रालयात परीक्षा न देता मिळणार नोकरी, महिन्याला 70 हजार रुपये पगार
परराष्ट्र मंत्रालयात परीक्षा न देता मिळणार नोकरी, महिन्याला 70 हजार रुपये पगार
मुंबई :परराष्ट्र मंत्रालयात नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्ण संधी चालून आली आहे. मंत्रालयातील डीपीए-IV डिवीजनमध्ये कंसल्टेंट म्हणजेच सल्लागार पदाच्या रिक्त जागांसाठी भरती सुरु आहे. जे उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करू इच्छितात त्यांनी अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. जर तुम्ही या पदासाठी पात्र असाल तर वेळ न घालवता अर्ज करा.
परराष्ट्र मंत्रालय भरती 2024 च्या अधिकृत पत्रानुसार ज्या उमेदवारांची निवड या पदासाठी होईल अशा उमेदवारांना प्रतिवर्ष 8.40 लाख रुपये पगार दिला जाईल. जे उमेदवार पदासाठी दिलेले नियम पूर्ण करतील अशांनी अर्जाचा फॉर्म भरून संबंधित कागदपत्र दिलेल्या पत्त्यावर पाठवायची आहेत. किंवा उमेदवार aopfsec@mea.gov.in ईमेलवर देखील त्यांचा अर्ज पाठवू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी आहे.
advertisement
परराष्ट्र मंत्रालयात अर्ज करण्यासाठी पात्रता :
अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पुरातत्व किंवा संवर्धन किंवा संग्रहालयात पदव्युत्तर पदवी/पदव्युत्तर, पदव्युत्तर डिप्लोमा किंवा त्याहून अधिक सिव्हिल/स्ट्रक्चरल इंजिनीअरिंग/आर्किटेक्चरमधील अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे. याशिवाय उमेदवाराकडे वारसा विकास प्रकल्प जसे उत्खनन, पुनर्स्थापन आणि संरक्षण, संग्रहालय विज्ञानच्या संबंधित कार्य, आइकनोग्राफी सर्वेक्षणमध्ये 10 वर्षांचा अनुभव असायला हवा. तुम्ही केलेल्या कामाचे पुरावे डिजाइनिंग, डीटीपी, सोशल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव असायला हवा.
advertisement
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किती असावे?
परराष्ट्र मंत्रालयात भरती 2024 साठी दिलेल्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय हे 35 ते 60 वर्ष इतकं असावं. परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकानुसार सदर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड मुलाखतीच्या माध्यमातून केली जाईल. अंतिम मुलाखत उमेदवाराच्या परफॉर्मेंसच्या आधारे होईल. मुलाखतीच्या दरम्यान कोणत्याही प्रकारचे टीए/डीए मिळणार नाही.
view comments
मराठी बातम्या/करिअर/
Government Job : परराष्ट्र मंत्रालयात परीक्षा न देता मिळणार नोकरी, महिन्याला 70 हजार रुपये पगार, फक्त करावं लागेल हे काम
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement