raj Thackeray : 'डोळ्यात तेल घालून लक्ष द्या', 'ती' जाहिरात पोस्ट करत राज ठाकरेंचे मनसेसैनिकांना आदेश

Last Updated:

Job alert : तरुण हे सरकारी नोकरीच्या शोधात असतात. तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर रेल्वेमध्ये तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे.

भारतीय रेल्वे जॉब अलर्ट
भारतीय रेल्वे जॉब अलर्ट
मुंबई : भारतीय रेल्वे विभागात बंपर भरती निघाली आहे. विभागाकडून सहाय्यक लोको पायलट पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. ही पदं भरण्यासाठी तब्बल 5696 जागा उपलब्ध आहेत. नोकरीच्या शोधात असलेले आणि या पदांसाठी पात्र असलेले तरुण रेल्वे लोको पायलट भरती 2024 साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. भारतीय रेल्वे मंत्रालयाने यासंदर्भात विविध वृत्तपत्रांमध्ये जाहिराती देखील दिल्या आहेत. दरम्यान मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ट्विटरवर या भरतीविषयी माहिती शेअर करत तरुणांना अर्ज करण्याचं अवाहन केलंय.
राज ठाकरे यांनी ट्विट करत म्हटलं की, 'भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाची एक जाहिरात आली आहे. सहाय्यक लोको पायलटच्या 5696 जागा आहेत. 18 ते 30 वयाची मर्यादा आहे. अधिक डिटेल्स या जाहिरातीत दिलेल्या वेबसाईटवर मिळेल. तो जरूर पहावा. ह्यामध्ये जास्तीत जास्त मराठी तरूण-तरूणींना रोजगार मिळेल हे पहावं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 'रोजगार आणि स्वयं-रोजगार विभाग यासाठी तत्पर आहेच.'
advertisement
पुढे राज ठाकरे म्हणाले की, 'महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांनी नुसतंच “बघा वेबसाईट” असं म्हणून चालणार नाही. शाखा-शाखांवर, संपर्क कार्यालयांत, गडांवर याचा रितसर तपशील लावावा. या विषयातल्या तज्ञ मंडळींना ही जाहिरात दाखवून व्यवस्थित सूचना तयार कराव्यात. त्या आपल्या कार्यालयांत लावाव्यात. वाटल्यास हा अर्ज कसा भरायचा, मुलाखत कशी द्यायची ह्याचंही पूर्ण मार्गदर्शन करावं. जास्तीत-जास्त मराठी तरूण ह्यात नोकरी कशी मिळवेल ह्याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष दिलं गेलं पाहिजे.'
advertisement
कुठे करु शकता अर्ज
विद्यार्थी 15 फेब्रुवारीपर्यंत रेल्वे भरती बोर्डाची वेबसाइट indianrailways.gov.in वर अर्ज करु शकता. भरतीमध्ये 10 वी आणि 12 वी उत्तीर्ण होण्यासोबतच संबंधित ट्रेडमध्ये डिप्लोमा पूर्ण असलेले किंवा इंजीनियरिंगचा डिप्लोमा मिळवलेले विद्यार्थी सामिल होऊ शकतात.
advertisement
बोर्डाने जारी केला ऑनलाइन सिलॅबस
या भरतीविषयी बोर्डाने सिलॅबस देखील जारी केला आहे. भरतीसाठी अर्जदाराचे किमान वय 18 वर्षे आणि जास्तीत जास्त वय 30 वर्ष ठरवण्यात आलंय. जास्तीत जास्त वयामध्ये तरुणांना नियमानुसार सूटचा फायदाही दिला जाऊ शकतो. भरती बोर्डाद्वारे नोटिफिकेशनसह लिखित परीक्षेसाठी ऑनलाइन सिलॅबस देखील जारी करण्यात आला आहे.
advertisement
जाणून घ्या किती द्यावे लागेल अर्ज शुल्क
अर्जासोबतच सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस वर्गाच्या अर्जदारांचं शुल्क 500 रुपये तर एससी, एसटी, ईएमएम, महिला आणि ईबीसी वर्गाच्या अर्जदारांसाठी अर्ज शुल्क 250 रुपये ठरवण्यात आलंय.
मराठी बातम्या/करिअर/
raj Thackeray : 'डोळ्यात तेल घालून लक्ष द्या', 'ती' जाहिरात पोस्ट करत राज ठाकरेंचे मनसेसैनिकांना आदेश
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement