भारीच! लोक विचारायचे पोट कसं भरणार? त्यानं केली बोलती बंद, 'असं' दिलं उत्तर

Last Updated:

त्याला पहिल्यापासून लिखाणाची, वाचनाची प्रचंड आवड. त्यामुळे तो आपसूकच चांगलं लिहू लागला. पुढे फोटोग्राफीचा छंद त्यानं जोपासला.

+
आज

आज तो अनेक तरुणांसाठी आदर्श ठरला आहे.

पियुष पाटील, प्रतिनिधी
मुंबई : मुंबईच्या लालबाग-परळ भागात लहानाचा मोठा झालेला रामेश्वर लहानपणापासून धडपड्या विद्यार्थी. कायम कला, क्रीडा क्षेत्रात अग्रेसर. त्याला पहिल्यापासून लिखाणाची, वाचनाची प्रचंड आवड. त्यामुळे तो आपसूकच चांगलं लिहू लागला. पुढे फोटोग्राफीचा छंद त्यानं जोपासला. पण फक्त लिहून आणि फोटो काढून कुठं पोट भरतं का? असं म्हणून त्याला अनेकजणांनी सुनावलं.
आपण टीव्हीवर, युट्यूबवर वेगवगेळ्या जाहिराती पाहतो. त्यातून अर्धा ते एका मिनिटात मोठमोठे आशय अत्यंत प्रभावीपणे मांडलेले असतात. ते आपल्या मनाला एवढे भिडतात की, आपण दुसऱ्या मिनिटाला त्या प्रोडक्ट्ची माहिती शोधतो. कधीतरी याचाही विचार केलाय का, अवघ्या अर्ध्या ते एका मिनिटात आपलं म्हणणं लोकांपर्यंत ठसठशीतपणे मांडणाऱ्या जाहिरात लेखकाला किती परिश्रम घ्यावे लागत असतील. लहानपणी वेगवेगळ्या कलाक्षेत्रात धडपडणारा रामेश्वर आज हेच मोठं काम करतोय. तो अनेक ब्रँडसाठी जाहिरात लिहितो.
advertisement
तरीही जाहिराती लिहून आणि फोटो काढून कुठे घर चालतं का? अशा प्रश्नांनाही त्याला सामोरं जावं लागलंच. परंतु जिद्द, चिकाटी, प्रचंड इच्छाशक्ती आणि स्वतःवर असलेल्या विश्वासाच्या जोरावर त्यानं अखेर या सर्व प्रश्नांना भलामोठा पूर्णविराम दिला. रामेश्वरनं 'मॅड फॅक्टर मीडिया' ही स्वतःची जाहिरात संस्था स्थापन केली आणि लोकांना रोजगार मिळवून दिला. आज तो अनेक तरुणांसाठी आदर्श ठरला आहे.
advertisement
सुरुवातीला 10 बाय 10च्या खोलीतून सुरू झालेला त्याचा प्रवास आज भायखळासारख्या उच्चभ्रू भागातल्या आलिशान ऑफिसवर येऊन ठेपलाय. आज रामेश्वरच्या साथीनं कॉन्टेन्ट रायटर, व्हिडीओ एडिटर, ग्राफिक डिझायनर आणि सोशल मीडिया अभ्यासक यांसारख्या विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या व्यक्तींची टीम काम करते. मनात जिद्द असेल तर आयुष्यभर कला जपून आपण आपल्या छंदालाच आपलं काम बनवून यशस्वी होऊ शकतो याचं हे उत्तम उदाहरण आहे.
view comments
मराठी बातम्या/करिअर/
भारीच! लोक विचारायचे पोट कसं भरणार? त्यानं केली बोलती बंद, 'असं' दिलं उत्तर
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement