ज्यांना शाळेत admission मिळत नव्हतं, त्यांना उभा केला आदर्श; वाचा, दिव्यांग भावांची ही प्रेरणादायी गोष्ट!

Last Updated:

पीयूष म्हणाला की, एकदा तो शाळेत प्रवेश घेण्यासाठी गेला असता त्याची अवस्था पाहून शाळा प्रशासनाने त्याला प्रवेश नाकारला. त्यानंतर त्यांनी शांती निकेतनमधून शिक्षण घेतले. अनेक मुलंही त्याची चेष्टा करायची.

दिव्यांग भावांचा प्रेरणादायी प्रवास!
दिव्यांग भावांचा प्रेरणादायी प्रवास!
विशाल भटनागर, प्रतिनिधी
मेरठ : लवकरच आता बोर्डाच्या परीक्षा सुरू होत आहेत. काही विद्यार्थी हे परिक्षेमुळे तणावात असतात. अनेक वेळा अडचणींमुळे ते डगमगतात. त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. ते नैराश्यातही जातात. मात्र, काही जण असे असतात, जे कितीही झालं तरी डगमगत नाहीत आणि सर्वांसमोर एक आदर्श उभा करतात. आज अशाच दोन भावांची कहाणी आपण जाणून घेऊयात.
advertisement
आयुष आणि पियुष या दोन जुळ्या भावांची ही कहाणी आहे. हे दोन्ही भावी दिव्यांग आहेत. तणावात असलेल्या विद्यार्थ्यांनी या दोन्ही भावांकडून शिकण्याची आवश्यकता आहे. या दोन्ही भावांनी कठीण परिस्थितीवर मात करत आपले शैक्षणिक उपक्रम सुरू ठेवले. आज त्यांची सर्वत्र चर्चा होत आहे.
आयुष आणि पियुष हे दोन्ही भाऊ उत्तरप्रदेशातील मेरठ येथील आहेत. दोन्ही भाऊ सेरेब्रल पाल्सी या गंभीर आजाराने ग्रस्त आहेत. आयुष आणि पियुषची आई सुधा गोयल सांगतात की, दोघांचा जन्म झाला, तेव्हा दोन्ही मुलांचे वजन 900-900 ग्रॅम होते. हे वजन सामान्यपेक्षा खूपच कमी आहे. तसेच दोन्ही भावांना सेरेब्रल पाल्सी या गंभीर आजाराने ग्रासले होते. त्यामुळे त्यांना चालणे आणि बसण्यात अडचणी येत होत्या. मात्र, दोन्ही भावांचे मनोबल चांगले होते. हळुहळू त्यांनी कठीण परिस्थितीवर मात करत त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात चांगले यश संपादन केले. दोघांनी बी.एड. केले असून आता ते पीएचडीकडे वाटचाल करणार असल्याचे म्हणाले.
advertisement
पीयूष म्हणाला की, एकदा तो शाळेत प्रवेश घेण्यासाठी गेला असता त्याची अवस्था पाहून शाळा प्रशासनाने त्याला प्रवेश नाकारला. त्यानंतर त्यांनी शांती निकेतनमधून शिक्षण घेतले. अनेक मुलंही त्याची चेष्टा करायची. पण त्या सर्व गोष्टींकडे विशेष लक्ष न देता त्यांनी फक्त आपल्या भविष्यावर लक्ष केंद्रित केले. दोन्ही भावांचे धाडस आणि जिद्द पाहता उत्तर प्रदेश सरकारनेही त्यांना सर्वोत्कृष्ट दिव्यांगजन पुरस्काराने सन्मानित केले आहे.
advertisement
पालकांना दिला हा सल्ला -
आयुष-पीयूष म्हणतात की, आता बोर्डाच्या परीक्षा सुरू होणार आहेत. अशावेळी दिसते की, पालक आपल्या मुलांवर चांगले गुण आणण्यासाठी दबाव टाकतात. त्यामुळे आई वडिलांनी मुलांवर दबाव टाकू नये. तसेच त्यांचा आपले सर्वोत्कृष्ट देण्यास सांगावे, असा सल्ला देत ते म्हणाले की, प्रत्येकामध्ये एक वेगळी प्रतिभा असते. त्यामुळे आपल्या मुलांची इतर मुलांसोबत तुलना करू नये. असे केल्याने आपल्याच मुलांमधील प्रतिभा लपते आणि तुम्ही त्यांना तणावात टाकतात.
advertisement
त्यामुळे आई वडिलांनी आपल्या मुलांमधील प्रतिभा ओळखून त्यांना पुढे घेऊन गेले तर ते वेगवेगळ्या क्षेत्रात आपलं नाव मोठं करतील. आम्हाला आमच्या वडिलांनी कठीण परिस्थितीत साथ दिली. त्यामुळे आज आम्ही समाजाची सेवा करत आहोत. लोकांना विविध विषयावर जागरूक करत आहोत, असे त्यांनी सांगितले.
view comments
मराठी बातम्या/करिअर/
ज्यांना शाळेत admission मिळत नव्हतं, त्यांना उभा केला आदर्श; वाचा, दिव्यांग भावांची ही प्रेरणादायी गोष्ट!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement