कोरोना काळात सुरू केला हा व्यवसाय, आज महिला महिन्याला करतेय 80 हजारांची कमाई
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
प्रीति जैन पंड्या असे या महिला डॉक्टरचे नाव आहे. त्यांनी कोरोनाकाळात घरातूनच स्वत:चे स्टार्टअप सुरू केले होते आणि घरकाम सांभाळत ते आज 70 ते 80 हजार रुपयांच्या व्यवसाय करत आहेत.
ओम प्रकाश निरंजन, प्रतिनिधी
कोडरमा : कोरोनाच्या काळात अनेकांनी स्टार्टअप सुरू केले होते आणि आज ते चांगल्या पद्धीतीने यशस्वी झाले असून चांगला पैसेही कमावत आहेत. यातच महिलांनीसुद्धा स्वयंरोजगाराच्या माध्यमातून एक चांगला आदर्श निर्माण केला आहे. मोठ्या प्रमाणात महिलाही व्यवसायात यशस्वी होत आहेत. आज जाणून घेऊयात अशाच एका डॉक्टर महिलेची यशस्वी कहाणी.
प्रीति जैन पंड्या असे या महिला डॉक्टरचे नाव आहे. त्यांनी कोरोनाकाळात घरातूनच स्वत:चे स्टार्टअप सुरू केले होते आणि घरकाम सांभाळत ते आज 70 ते 80 हजार रुपयांच्या व्यवसाय करत आहेत. याबाबत प्रीति जैन पंड्या यांनी सांगितले की, पूर्वी त्या स्वतःसाठी हर्बल उत्पादने तयार करायच्या आणि त्यांच्या त्वचेवर आणि केसांवर वापरायच्या. कोरोनादरम्यान केसांची काळजी कशी घ्यावी आणि सौंदर्य निगा कशी राखावी या ऑनलाइन कार्यशाळेत भाग घेतला. यामध्ये त्यांना लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. कार्यशाळेतच, अनेकांनी त्वचेची निगा आणि केसांची काळजी संबंधित समस्यांवर आधारित त्यांच्या हर्बल उत्पादनांची ऑर्डर दिली.
advertisement
त्यांचे पती नवीन जैन पंड्या यांनी त्यांना आपले स्टार्टअप देशाच्या कानाकोपऱ्यात नेण्यात खूप मदत केली. त्यांनी सांगितले की, त्वचा आणि केसांच्या काळजीशी संबंधित सर्व हर्बल उत्पादने त्या घरीच तयार करतात. यामध्ये 20 हून अधिक हर्बल घटकांच्या मिश्रणातून फेस पॅक तयार केला जात आहे. याला बाजारात जास्त मागणी आहे. लोकांकडून ऑर्डर मिळाल्यानंतर, त्यांच्याशी वैयक्तिकरित्या कॉल करून आणि त्यांच्या त्वचेशी संबंधित समस्या तपशीलवार जाणून घेतल्यावर, त्याच घटकांचे मिश्रण तयार करून फेस पॅक तयार केले जातात. फेस पॅक व्यतिरिक्त पिगमेंटेशन पॅक आणि पिंपल पॅक देखील बनवले जातात, असे त्यांनी सांगितले.
advertisement
पुढे त्या म्हणाल्या की, केस आणि स्किन केअरशी संबंधित ऑनलाइन कोर्स केल्यानंतर त्या हर्बल उत्पादने तयार करतात. त्यांनी बनवलेल्या कोणत्याही उत्पादनात कृत्रिम रंग किंवा कृत्रिम सुगंध वापरला जात नाही. त्यांच्या उत्पादनांमध्ये हर्बल घटकांचा केवळ नैसर्गिक सुगंध असतो. याशिवाय ते घरच्या घरी गुलाबपाणी, हर्बल ग्लिसरीन, 9 प्रकारच्या हर्बल तेलांच्या मिश्रणापासून बनवलेले केसांचे तेल, 12-13 प्रकारचे गॅसरहित सुगंधी परफ्यूम, कडुनिंब, पुदिना, तुळस आणि मुलतानी मातीपासून तयार केलेले साबण, शाम्पू आणि मॉइश्चरायझर तयार करतात.
advertisement
देशभरात डिलिव्हरी -
view commentsदेशाच्या विविध भागात लोकांच्या ऑर्डर पोहोचवल्या जातात, असेही त्यांनी सांगितले. डिलिव्हरीनंतर, जर एखाद्या ग्राहकाने उत्पादन खराब झाल्याची तक्रार केली, तर त्या संबंधित व्हिडिओच्या आधारे, त्याला उत्पादन पुन्हा पाठवले जाते किंवा त्याचे पैसे परत केले जातात. मात्र, आतापर्यंत तीन वर्षांत अशी केवळ दोन प्रकरणे समोर आली आहेत, असेही त्या म्हणाल्या. आयुर्वेदिक औषधी वनस्पती महाग असल्याने, हर्बल फेस पॅकची किंमत बाजारात उपलब्ध असलेल्या कृत्रिम फेस पॅकपेक्षा थोडी जास्त आहे. कुणालाही जर यासंबंधी उत्पादने हवी असतील तर 6202638871 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर संपर्क करून त्यांच्या हर्बल उत्पादनांची ऑर्डर देऊ शकतात, असे त्यांनी सांगितले.
Location :
Kodarma,Jharkhand
First Published :
January 25, 2024 10:43 AM IST


