11 वर्षांची ती अन् 32 वर्षांचा तो, बीडमध्ये अल्पवयीन मुलीचा तासाभरात दोनदा विवाह, पहिला पळाला अन्...
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Beed Crime News: बीडमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इथं एका ११ वर्षीय मुलीचा तासाभरात दोन वेगवेगळ्या तरुणांसोबत दोन वेळा विवाह लावण्यात आला आहे.
Beed Crime News: बीडमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इथं एका ११ वर्षीय मुलीचा तासाभरात दोन वेगवेगळ्या तरुणांसोबत दोन वेळा विवाह लावण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे दोन्ही नवरदेव हे मुलीपेक्षात जवळपास वयाने तिप्पट आहेत. असं असतानाही त्यांनी ११ वर्षीय मुलीसोबत लग्न केलं. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पाठलाग करत नवरदेवाला पकडलं. तसेच मुलीची सुटका केली. अल्पवयीन मुलीचा अशाप्रकारे तासाभरात दोनवेळा विवाह लावून दिल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. वडिलांसह सावत्र आईने मुलीचा अशाप्रकारे विवाह लावल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा धक्कादायक प्रकार बीड शहरात गुरुवारी घडला. या घटनेतील ३२ वर्षांच्या पहिल्या नवरदेवाला आधीच दोन बायका आहेत. मात्र त्या नांदत नाहीत. तर दुसऱ्या नवरदेवाचे हे पहिलेच लग्न आहे. मात्र लग्नानंतर पळून जाताना पोलिसांनी रस्त्यावर जीप आडवी लावून त्याला पकडले. संबंधित प्रकरणाची पोलीस कसून चौकशी करत आहेत. याप्रकरणी प्रशासनाकडून उशिपर्यंत गुन्हा नोंद झाला नव्हता.
advertisement
बीडमध्ये पाचवीतील मुलीचा एकाच दिवशी दोन वेळा लावला विवाह
बीड शहरातील १३ वर्षीय मुलगी नुकतीच पाचवी उत्तीर्ण झाली आहे. सोमवारपासून तिचे इयत्ता सहावीचे वर्ग सुरू होणार होती. त्यासाठी ती तशी तयारीही करत होती. मात्र गुरुवारी तिच्या वडिलांनी आणि सावत्र आईने बीडच्या बेलखंडी येथील ३२ वर्षीय मुलासोबत सकाळी निकाह लावला. विशेष म्हणजे या नवरदेवाला आधीच दोन बायका आहेत, मात्र त्या दोघीही नांदत नाहीत. त्यापैकी एकीने पोटगीचा दावा दाखल केलेला आहे. तिनेच या बालविवाहाची माहिती प्रशासनाला दिली होती.
advertisement
पहिला नवरदेव पळाला, दुसऱ्याला पाठलाग करून पकडलं
त्यानंतर पोलीस कारवाईसाठी येत असल्याचे पाहून पहिल्या नवरदेवाने साज उतरवला. त्यानंतर दुसऱ्याच नवरदेवाला उभे करून त्याने स्वतः पळ काढला. त्यानंतर मुलीचा गेवराई तालुक्यातील दुसऱ्या मुलासोबत काही तासांनी दुसरा विवाह लावण्यात आला. सामाजिक कार्यकर्ता तत्त्वशील कांबळे यांनी हा प्रकार उघडकीस आणला. बालकल्याण समितीचे अध्यक्ष अशोक तांगडे यांनीही प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस ठाण्यात धाव घेतली. यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. माझा बळजबरीने विवाह लावल्याचं पीडित मुलीने पोलिसांना सांगितलं आहे. पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.
Location :
Bid,Maharashtra
First Published :
Jun 13, 2025 9:29 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
11 वर्षांची ती अन् 32 वर्षांचा तो, बीडमध्ये अल्पवयीन मुलीचा तासाभरात दोनदा विवाह, पहिला पळाला अन्...









