पाहुणा म्हणून आला अन् डाका टाकून गेला; आत्याच्या पोरानेच केली घरफोडी, 11 लाखांच्या दागिन्यांवर डल्ला!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
Satara News : 'पाहुणा' म्हणून घरी आलेल्या आत्याच्या मुलानेच घरातून सोन्याचे दागिने चोरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शाहूपुरी पोलिसांनी या...
Satara News : 'पाहुणा' म्हणून घरी आलेल्या आत्याच्या मुलानेच घरातून सोन्याचे दागिने चोरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शाहूपुरी पोलिसांनी या आरोपीला मुंबईतून अटक केली असून, त्याच्याकडून साडेतेरा तोळ्यांचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. पोलिसांनी ऋषिकेश पांडुरंग देटे (वय 29, रा. कोपरखैरणे, नवी मुंबई) या तरुणाला अटक केली आहे.
नेमकं प्रकरण घडलं कसं?
आदित्य सुनील भोसले (वय २२, रा. धर्मवीर संभाजी कॉलनी, शाहूपुरी) यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. आदित्यची आई आणि आजी यांनी त्यांचे सोन्याचे दागिने एका कपाटात ठेवले होते. त्यामध्ये 29 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, 26 ग्रॅमच्या दोन बांगड्या, 14 ग्रॅमची बोरमाळ, पाच ग्रॅमची अंगठी, 39 ग्रॅमचे मंगळसूत्र व सात ग्रॅमची कर्णफुले व वेल, अशा दागिन्यांचा समावेश होता.
advertisement
2 वेळा पाहुणा म्हणून आला होता घरी
31 ऑगस्ट रोजी गौरीला दागिने घालण्यासाठी त्यांनी कपाट उघडले, तेव्हा त्यांना दागिने जागेवर नसल्याचे दिसून आले. त्यांनी तात्काळ शाहूपुरी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी तपास सुरू केला असता, ऋषिकेश हा गेल्या काही दिवसांत दोन वेळा त्यांच्या घरी येऊन गेल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात ऋषिकेशवर संशय बळावला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यानेच चोरी केल्याची कबुली दिली.
advertisement
पोलिसांनी त्याच्याकडून 11 लाख रुपये किमतीचे दागिने हस्तगत केले. विशेष म्हणजे, आरोपी ऋषिकेशवर यापूर्वीही गुन्हे दाखल असून, गोवंडी पोलिसांनी त्याला 'मोक्का' (MCOCA) लावला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
हे ही वाचा : मिरचीचा 'तिखट' व्यवहार! रत्नागिरीत शेतकरी आणि ग्राहक हैराण, मात्र व्यापारी का होताहेत मालामाल?
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 08, 2025 10:00 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
पाहुणा म्हणून आला अन् डाका टाकून गेला; आत्याच्या पोरानेच केली घरफोडी, 11 लाखांच्या दागिन्यांवर डल्ला!