Beed News: लग्नाची हळद उतरण्याअगोदरच बीडची नवरी प्रियकरासोबत पळाली भुर्रर्रर्र, आई-बापाला पश्चाताप
- Published by:Prachi Amale
Last Updated:
लग्नाच्या गडबडीमुळे थकलेले सगळे नातेवाईक गाढ झोपलेले असताना हीच संधी साधत नवरीने घरातून धूम ठोकली.
बीड : प्रेमासाठी काही लोक वाटेल ते करतात. अशीच एक अजब घटना आता समोर आली आहे. अंगावरची हळद उतरण्याआधीच नवरी प्रियकरासोबत पळून गेल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये घडली आहे. नातेवाईकांकडून वधूची शोधाशोध सुरू झाली. मात्र, वधू सापडली नाही. अखेर वधूच्या पित्याने या प्रकरणी तक्रार देखील नोंदवली. केज तालुक्यात ही घटना घडली आहे.
9 मे रोजी वडिलांनी लेकीचं धुमधडाक्यात लग्न लावलं, 10 मे रोजी नवरीने देवदर्शन देखील केलं,त्यानंतर सासरहून तिची माहेरी पाठवणी करण्यात आली. सगळे आनंदात होते मात्र नवरीच्या मनात काही तरी भलतच सुरू होती. माहेरी आल्यानंतर रात्री शौचाला बाहेर जाण्याच्या बहाण्याने भावजईचा फोन घेतला आणि शेजारच्या गावात राहणाऱ्या प्रियकराला फोन केला, त्यानंतर घरी येऊन झोपली. लग्नाच्या गडबडीमुळे थकलेले सगळे नातेवाईक गाढ झोपलेले असताना हीच संधी साधत नवरीने घरातून धूम ठोकली.
advertisement
सोन्याचे दागिने घेऊन धूम ठोकली
मध्यरात्री आईला जाग आल्यानंतर ती खोलीत गेली असता घरातील लाईट बंद होती. आईने लाईट लावली असता मुलगी दिसली नाही, म्हणून एकच गोंधळ केला. त्यानंतर नातेवाईकांनी मुलीचा शोध घेतला असता ती कुठेच आढळून आली नाही. अखेर नवरीच्या भावाने केज पोलिस स्टेशनमध्ये बहीण हरवल्याची तक्रार केली. प्रियकरासोबत पळून जाताना नवरीने सोन्याचे कानतले, मंगळसूत्र, एटीएम कार्ड, क्रेडिट कार्ड आणि मोबाईलसब पळ काढला आहे.
advertisement
जालन्यातील घटनेनं खळबळ
जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील खामखेडा येथील अनिल फदाट हे भावासाठी मुलगी पाहत होते. त्यांच्या ओळखीतील एकाने मुलगी आहे असे सांगितले होते. त्यानुसार मुलींकडच्यांनी घरी येऊन मुलाला पसंत केले. मुलगी पाहून देतो म्हणून एजंटाने काही रक्कम द्यावी लागेल, लग्न तुम्हालाच लावावे लागेल, असे सांगितले. मुलाच्या भावाने अट मान्य करून लग्नास होकार दिला. मुलीचे स्थळ पाहून देणाऱ्याला रक्कमही दिली. खामखेडा गावात 9 मे रोजी रात्री उशिरा लग्न लागले. दुसऱ्या दिवशी मुलीला राजूर येथे दर्शनासाठी घेऊन जायचे म्हणून नवरदेव, नवरी आणि तिची बहीण जात होते. राजूर रोडवर नवरीने थोडं थांबा म्हणून गाडी थांबवली. त्याच गाडीजवळ असलेल्या दुसऱ्या गाडीत नवरी आणि तिची बहीण बसून पसार झाल्या.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 13, 2025 3:37 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Beed News: लग्नाची हळद उतरण्याअगोदरच बीडची नवरी प्रियकरासोबत पळाली भुर्रर्रर्र, आई-बापाला पश्चाताप









