बीड पुन्हा हादरलं! जिवलग मैत्रिणीच्या प्रियकरावर जडलं प्रेम; मुलाच्या मदतीने संपवलं अन् मृतदेह बॉक्समध्ये भरला अन्...
- Reported by:SURESH JADHAV
- Published by:Prachi Amale
Last Updated:
मध्यरात्री मृतदेह एका खोक्यात ठेवला. त्यानंतर तिचा मृतदेह स्कूटीवर घेऊन बीड शहरापासून दूर नेऊन नाल्यात फेकला.
बीड : दोन मैत्रिणीमध्ये बॉयफ्रेंडवरून वाद झाला. यातूनच संतापलेल्या एका मैत्रिणीने आपल्या मुलाच्या मदतीने होमगार्ड असलेल्या महिलेचा गळा दाबून खून केलाचा धक्कादायक प्रकार बीड शहरात उघडकीस आला आहे. खुन झाल्यानंतर मृतदेह बीड शहरापासून किमी अंतरावर बाहेर नेऊन नाल्यात फेकला. बीड शहरातील अंबिका चौक परिसरात घडली आहे.
अयोध्या राहुल व्हरकटे (वय 26 ) असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी मैत्रिणीसह दोघांना अटक केली आहे. वृंदावनी फरताडे व अल्पवयीन मुलाला अटक केली आहे ताब्यात घेतले आहे अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक गजानन क्षीरसागर यांनी दिली.
बॉयफ्रेंड ठरला अडसर
अयोध्याचे पतीचं चार वर्षापूर्वी अपघातात निधन झाले. अयोध्याला तीन वर्षाची ईश्वरी नावाची मुलगी असून, ती सासूकडे गावी असते. अयोध्या या होमगार्ड म्हणून काही महिन्यांपूर्वी भरती झाल्या होत्या. त्या बीड शहरातील अंबिका चौक परिसरात राहून पोलिस भरतीचीही तयारी करत होत्या. वृंदावनी फरताडे नावाची त्यांची मैत्रीण होती. वृंदावनी फरताडे आणि एका राठोड नावाच्या मुलाचे प्रेम प्रकरण सुरू होते.
advertisement
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटना कैद
काही कालावधीने आयोध्याची ओळख राठोडसोबत झाली. राठोडने फरताडेला दूर करत अयोध्याला जवळ केले. हाच राग फरताडेच्या डोक्यात होता. दोन दिवसांपूर्वी तिने अयोध्याला घरी बोलावले. फरताडेने तिच्या मुलाच्या मदतीने तिचा गळा दाबून खून केला.आरोपींनी अयोध्याचा यांचा खून केल्यानंतर काही वेळ मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची, यावर विचार केला. त्यानंतर मध्यरात्री मृतदेह एका खोक्यात ठेवला. त्यानंतर तिचा मृतदेह स्कूटीवर घेऊन बीड शहरापासून दूर नेऊन नाल्यात फेकला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, तिने हत्येची कबुली दिली.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Aug 22, 2025 4:35 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
बीड पुन्हा हादरलं! जिवलग मैत्रिणीच्या प्रियकरावर जडलं प्रेम; मुलाच्या मदतीने संपवलं अन् मृतदेह बॉक्समध्ये भरला अन्...








