advertisement

'आणखी 2 लाख आण', हुंड्यासाठी क्रूरतेचा कळस, बीडमध्ये विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

Last Updated:

Crime in Beed: वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरण ताजं असताना आता बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात देखील असाच प्रकार घडला आहे.

News18
News18
सुरेश जाधव, प्रतिनिधी बीड: गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण देशभर गाजत आहे. सासरच्यांनी हुंड्यासाठी केलेल्या छळाला कंटाळून वैष्णवीनं आपल्या राहत्या घरात आत्महत्या केली आहे. वैष्णवीच्या आत्महत्येची बातमी समोर आल्यानंतर राज्यभर संताप व्यक्त करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी वैष्णवीच्या पतीसह सासू-सासरे, दीर नणंदसह इतर काही जणांना अटक केली आहे.
वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरण ताजं असताना आता बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात देखील असाच प्रकार घडला आहे. येथील गीता गावात एका विवाहित महिलेनं आत्महत्या केली आहे. माहेरहून पैसे घेऊन येण्यासाठी महिलेचा मागील काही दिवसांपासून छळ सुरू होता. या छळाला कंटाळून महिलेनं बुधवारी टोकाचं पाऊल उचललं. या प्रकरणी मयत विवाहितेच्या भावाने दिलेल्या तक्रारीनुसार पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
advertisement
शुभांगी संतोष शिंदे असं आत्महत्या करणाऱ्या विवाहित महिलेचं नाव आहे. ती बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई तालुक्यातील गीता या गावातील रहिवासी आहे. तिने सासरच्या मंडळींनी केलेल्या छळामुळे आत्महत्या केल्याचा आरोप माहेरच्या लोकांनी केला आहे.
पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, माहेरच्या लोकांनी आधीच चार लाख रुपये दिले होते. यानंतरही दोन लाख आण, म्हणून शुभांगीचा छळ सुरू होता. तिला अपमानजनक वागणूक दिली जात होती. सासरच्यांकडून सातत्याने सुरू असलेल्या त्रासाला कंटाळून शुभांगीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येची घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिसांनी शुभांगीचा मृतदेह स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणात शुभांगीच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून पाच जणांना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात पतीसह सासू-सासरे आणि नणंद यांनी हुंड्यासाठी जाच केल्याचं म्हटलं आहे.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
'आणखी 2 लाख आण', हुंड्यासाठी क्रूरतेचा कळस, बीडमध्ये विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
Next Article
advertisement
Eknath Shinde: महापालिका निकालानंतर महायुतीत बिनसलं? एकनाथ शिंदेंची सलग दुसऱ्या कॅबिनेट बैठकीला दांडी, नेमकं कारण आलं समोर
महापालिका निकालानंतर महायुतीत बिनसलं? शिंदेंची सलग दुसऱ्या कॅबिनेटला दांडी,
  • राज्याच्या राजकीय वर्तुळात महापालिका निवडणुकीनंतर मोठ्या घडामोडी सुरू आहेत.

  • आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर राहणा

  • मागील बैठकीतही एकनाथ शिंदे हे अनुपस्थित होते.

View All
advertisement