भाजपच्या बड्या नेत्याच्या मुलाचं ऑन कॅमेरा नको ते कांड, 130 अश्लील व्हिडीओ-फोटो लीक
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
भाजप नेत्याच्या मुलाचे 130 अश्लील व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. हे व्हिडिओ गर्लफ्रेंडकडून लीक झाल्याची चर्चा आहे. विरोधकांनी भाजपवर टीका केली असून पोलिसांवर दबाव असल्याचे म्हटले आहे.
मनोहरलाल धाकड, बब्बन सिंह, मुनिरत्ना यांचे अश्लील चाळे करतानाचे व्हिडीओ फोटो समोर आले होते. आता पुन्हा एकदा भाजपच्या बड्या नेत्याच्या मुलाचा व्हिडीओ समोर आला आहे. त्याने पत्नीला खिजवण्यासाठी वेगवेगळ्या मुलीसोबत अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एक दोन नाही तर तब्बल 13 व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे हे व्हिडीओ गर्लफ्रेंडकडूनच लीक झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. या घटनेनंतर भाजपच्या महिला नेत्याला फोन करत असून त्या फोन घेत नसल्याची प्राथमिक माहिती देखील मिळाली आहे. मुलाने केलेले कांड समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे.
मध्य प्रदेशातील मंदसौर इथे भाजप नेत्याच्या हायवेवरच्या अश्लील व्हिडिओ स्कँडलवरील वाद अद्याप शमलेला नाही तोच यूपीतील मैनपुरीमधून असाच एक अश्लील व्हिडिओ स्कँडल समोर आला आहे. शहरातील एका विभागाच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षाच्या मुलाचे 130 अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एकीकडे भाजप नेते फोनही उचलत नाहीत. दुसरीकडे, विरोधी पक्षांनी हे प्रकरण तापवल्याचं समजत आहे.
advertisement
हे व्हिडिओ मैनपुरी शहरातील एका प्रसिद्ध मिठाई दुकानाच्या संचालकाच्या धाकट्या भावाचे आणि भाजप नेत्याच्या मुलाचे असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडिओमध्ये तो आणि एक महिला अत्यंत अश्लील कृत्य करत आहेत. व्हायरल झालेले 130 व्हिडिओ शहरातील वेगवेगळ्या हॉटेल्स, रेस्टॉरंट्समध्ये शूट केले होते. भाजप नेत्याचा मुलगा विवाहित असून तो हे सगळे व्हिडीओ पत्नीला दाखवायचा. त्याच्या या कृत्यांमुळेच पत्नीसोबत वाद सुरू होते.
advertisement
अभी तक के सभी बलात्कारी भाजपाइयों को शुभम गुप्ता ने पछाड़ दिया है 130 सारे वीडियो बहुत ही घिनौने है ,
ये ही भाजपा के संस्कार है इसकी माता जी मैनपुरी भाजपा महिला सभा की नगर अध्यक्ष है। pic.twitter.com/emzkj1lrLX
— Shivam Yadav (@ShivamYadavjii) May 30, 2025
advertisement
भाजपा में चरित्रहीन नेता भरे हुए है।
कुछ दिन रुकते है फिर एक नया खिलाड़ी सामने आ जाता है।
बब्बन सिंह
मनोहर लाल धाकड़
और अभी शुभम गुप्ता
शादीशुदा शुभम गुप्ता के 130+ आपत्तिजनक वीडियो हुए वायरल – कई महिलाओं संग संबंध, वीडियो बनाकर धमकाता था।#MIvsGT pic.twitter.com/qmDJ4zFult
— Chandan Yadav (@ChandankryadavN) May 30, 2025
advertisement
राग अनावर न झाल्याने तरुणाने तिला सिगरेटचे चटके दिले तेव्हा हा संपूर्ण प्रकार तिने पोलिसांना सांगितला. मात्र कौटुंबिक बाब आणि राजकीय घराण्यामुळे ही गोष्ट दाबण्यात आली. पोलीसही या प्रकरणात फार पडले नाहीत. तरुण त्याच्या प्रेयसीसोबत व्हिडिओ बनवून आणि ते बायकोला दाखवून तिचा मानसिक छळ करायचा. हे व्हिडीओ लीक कसे झाले त्याने स्वत: केले की गर्लफ्रेंडने याबाबत सध्या अनेक प्रश्न आहेत. सोशल मीडियावर याची तुफान चर्चा रंगली आहे.
advertisement
भाजपने या प्रकरणात मौन बाळगले आहे. महिला मोर्चापासून ते जिल्हा संघटनेपर्यंत कोणताही अधिकारी काहीही बोलण्यास तयार नाही. सपा, बसपा, काँग्रेसने भाजपला यावरुन चांगलंच घेरलं आहे. भाजप नेत्यांचे आणि त्यांच्या कुटुंबाशी संबंधित लोकांचे दुष्कृत्य जनतेसमोर येत असल्याचे म्हटले जाते. कारवाई करण्याऐवजी, पोलिस-प्रशासन सत्तेच्या दबावाखाली गप्प बसले आहे. 2027 च्या निवडणुकीत जनता त्यांना चांगलाच धडा शिकवेल असा इशारा विरोधकांनी दिला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 31, 2025 9:14 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
भाजपच्या बड्या नेत्याच्या मुलाचं ऑन कॅमेरा नको ते कांड, 130 अश्लील व्हिडीओ-फोटो लीक